अकोला– कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर मास्क न वापरणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याप्रकरणी आज महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करुन शहरात १०१ जणांकडून २१ हजार ४७० रुपयांचा दंड वसूल केला. उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार व उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी ही मोहिम शहरातील विविध भागात राबवली. अचानक राबविलेल्या या मोहिमेमुळे शहरात खळबळ उडाली. शहरातील सिटी कोतवाली येथून ही मोहिम राबविण्यास शहरातील राम मंदीर परिसर, कपडा बाजार, तिलक रोड, गांधी रोड, दुर्गा चौक इ. ठिकाणी १०१ जणांवर कारवाई करुन दंड वसूली करण्यात आली.