तेल्हारा(प्रतिनिधी)- कोरोनाने अकोला जिल्ह्यात हाहाकार माजविला असून गावागावात कोरोनाने एन्ट्री केली असून संपूर्ण जिल्हा हा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे अशातच प्रशासनाकडून डबल सीट दुचाकी चालवणाऱ्यांवर शहरात कारवाई करणे सुरू केले असून न प प्रशासन सोशल डिस्टसिंग न ठेवणाऱ्यावर दंड आकारत आहे.
गेल्या महिनाभरापूर्वी मुंबई येथून आलेल्या प्रवाशांमुळे कोरोनाचा शिरकाव तालुक्यात झाला होता मात्र पोलीस प्रशासनाच्या कामगिरीने कोरोना पादुर्भाव आटोक्यात आला.मात्र आता गाडेगाव व माळेगाव येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाचा पादुर्भाव वाढावा नाही म्हणून जिल्हा प्रशासनाणे दिलेल्या आदेशानुसार आज ठाणेदार विकास देवरे यांनि डबल सीट वाहन चालवणाऱ्या कारवाईचा बडगा उचललेला असून कारवाईला न जुमानऱ्यांची दुचाकी जप्त करण्यात येईल असे अवर अकोला न्यूज शी बोलतांनि ठाणेदार विकास देवरे यांनी सांगितले. तसेच शहरात सोशल डिस्टनसिंग सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणारे तसेच थुंकणार्यावर कारवाई करण्यात येत असून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
शहरासह तालुक्यातील जनतेने विनाकारण घराच्या बाहेर पडू नये जेणेकरून कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यास मदत होईल तसेच दुचाकाचीवर डबल सीट दिसल्यास कारवाई करून दुचाकी जप्त करण्यात येतील व शहरातील दुकानदार व्यावसायिकांनी गिऱ्हाईकांमध्ये सोशल डिस्टनसिंग ठेवावे व नियमांचे पालन करावे नाहीतर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल
विकास देवरे
ठाणेदार पोलिस स्टेशन तेल्हारा