कोरोना अलर्ट
आज बुधवार दि.२४ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-२२५
पॉझिटीव्ह अहवाल-५४
निगेटीव्ह-१७१
अतिरिक्त माहिती
आज सकाळी प्राप्त अहवालात ५४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात १८ पुरुष रुग्ण हे जिल्हा कारागृहातून संदर्भित आहेत. उर्वरित ३६ जणांमध्ये १४ महिला आहेत. तर २२ पुरुष आहेत. त्यात एका तीन महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. यातील सात जण तारफैल, सात जण न्यू तारफैल, दगडीपुल येथील चार जण, खदान येथील दोन जण, बाळापूर येथील दोन जण, तर उर्वरित बार्शी टाकळी, कामा प्लॉट, सिंधी कॅम्प, रामदास पेठ, सिव्हील लाईन, शिवर, जीएमसी होस्टेल, कळंबेश्वर, जळगाव जामोद, लहान उमरी, कान्हेरी गवळी, सिद्धार्थ नगर, आदर्श कॉलनी, परदेशीपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल (दि.२३) रात्री तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात सोनटक्के प्लॉट येथील ७० वर्षीय पुरुष असून ते दि.१२ रोजी दाखल झाले होते. अन्य एक डाबकी रोड येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्ण असून हे दि.९ रोजी दाखल झाले होते. तर कामा प्लॉट येथील ८० वर्षीय महिला रुग्ण असून ही महिला दि.२१ रोजी दाखल झाली होती.
दरम्यान आज सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील तिघांना घरी सोडण्यात आले आहे तर अन्य तिघांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात पाठवण्यात आले आहे.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १२९८
मयत-७० (६९+१), डिस्चार्ज- ८३२
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३९६
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!