अकोला,दि. २२- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १९४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४३ अहवाल निगेटीव्ह तर ५१अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज सायंकाळी तिघा महिलांना डिस्चार्ज देण्यात आला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १२४३ झाली आहे.आजअखेर ४१२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण ८८११ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ८४७९, फेरतपासणीचे १३४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १९८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ८७६२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ७५१९ आहे.तर पॉझिटीव्ह अहवाल १२४३ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ५१ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात ५१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी प्राप्त अहवालात ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात २२ महिला व २६ पुरुष आहेत. त्यात बाळापूर येथील आठ, अकोट फाईल, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, गुलजारपुरा येथील चार, गंगानगर व पिंपळखुटा येथील प्रत्येकी तिन, शंकर नगर, शिवसेना वसाहत व पातुर येथील प्रत्येकी दोन, कमला नेहरु नगर, सोळासे प्लॉट, खदान, कळंबेश्वर, बार्शीटाकळी, शिवनी, अकोट, दुर्गा नगर, तारफैल, महाकाली नगर, गांधी नगर, सोनटक्के प्लॉट, गिता नगर, भगतवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील तेरा अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केन्द्रावरील आहेत.
आज सायंकाळी प्राप्त अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. ते शिदोजी वेताळ पातूर, रजपूतपुरा, तोष्णिवाल ले आऊट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
तिघांना डिस्चार्ज
दरम्यान दुपारनंतर तीन जणांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. त्यात तिनही महिला असून तिघींना घरी सोडण्यात आले आहे. त्या भांडपुरा, हमजापेठ आणि वाशिम बायपास येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
४१२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत १२४३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ६६ जण (एक आत्महत्या व ६५ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ७६५आहे. तर सद्यस्थितीत ४१२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.