• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

आर्यभट्ट खगोलशास्त्र संशोधन संस्था करणार आगामी सूर्यग्रहणाचे समाज माध्यमांवर थेट प्रसारण

Media Desk by Media Desk
June 19, 2020
in राष्ट्रीय, Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
आर्यभट्ट खगोलशास्त्र संशोधन संस्था
12
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 21 जून 2020 रोजी सकाळी 10:25 पासून भारताच्या उत्तरेकडील भागातून पाहता येईल. या संदर्भात, नैनितालच्या आर्यभट्ट खगोलशास्त्र संशोधन संस्थेने (एआरआयईएस), तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) या सरकारच्या स्वायत्त संस्थेने 19 जून 2020 रोजी दुपारी 03:30 वाजता आर्यभट्ट संशोधन संस्थेचे संचालक प्रा. दिपंकर बॅनर्जी यांचे ‘सूर्यग्रहणांचे विज्ञान’ या विषयावर खास व्याख्यान आयोजित केले आहे. शिवाय झूम, यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून सूर्यग्रहणाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे.

हे सूर्यग्रहण आफ्रिका, आशिया व युरोपच्या काही भागांतून पाहता येईल आणि विशेष म्हणजे उत्तर भारतातून हे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहता येणार आहे. रविवारी सकाळी 10:25 वाजता सुरु होणारे ग्रहण दुपारी 12:08 वाजता पूर्णावस्थेत दिसेल; तर दुपारी 01:54 वाजता ग्रहण सुटेल. 26 डिसेंबर, 2019 रोजी दक्षिण भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते आणि देशातील विविध भागांमधून खंडग्रास ग्रहण दिसले होते. भारतात यापुढील कंकणाकृती सूर्यग्रहण पुढील दशकात म्हणजे 21 मे 2031 रोजी तर खग्रास सूर्यग्रहण 20 मार्च 2034 रोजी दिसेल.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

जेव्हा चंद्राच्या छायेमुळे (अमावस्येला) सूर्य आंशिक किंवा पूर्णपणे झाकला जातो तेव्हा अनुक्रमे खंडग्रास, कंकणाकृती किंवा खग्रास सूर्यग्रहण होते. सूर्य ग्रहणावेळी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि गडद भाग तयार होतो ज्याला अंब्र म्हणतात आणि तुलनेने कमी गडद भागाला पेनंब्र म्हणतात. सूर्यग्रहणांपैकी खग्रास सूर्यग्रहण हे क्वचित दिसते. जरी प्रत्येक महिन्यात अमावस्या असली तरी दरवेळी सूर्यग्रहण होत नाही. पृथ्वी आणि सूर्याच्या पृष्ठभागाच्या तुलनेत चंद्राचा कक्षा सुमारे 5˚च्या कोनात झुकलेली आहे; या वस्तुस्थितीमुळे प्रत्येक अमावास्येला ग्रहण दिसत नाही. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येणे, ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे.

“ग्रहणासारख्या खगोलशास्त्रीय घटना म्हणजे तरुणांना आणि समाजाला विज्ञानाविषयी उत्तेजन आणि शिक्षण देण्याचीआणि पर्यायाने त्यांच्यात विज्ञानविषयक रुची निर्माण करण्याची अपवादात्मक संधी आहे.” असे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव, प्राध्यापक आशुतोष शर्मा, यांनी म्हटले आहे.

ग्रहणादरम्यान काय करावे आणि काय करू नये, याविषयीची यादी आर्यभट्ट संशोधन संस्थेने निर्दिष्ट केली आहे:

काय करावे:

1. डोळ्यांना इजा होऊ नये, म्हणून ग्रहण पाहण्याकरिता ग्रहण चष्मा (आयएसओ प्रमाणित) किंवा योग्य फिल्टरसह कॅमेरा वापरा.

2. पिनहोल कॅमेरा किंवा दुर्बिणीचा वापर करून पडद्यावरील प्रतिमा पाहणे, हा कंकणाकृती सूर्य ग्रहण पाहण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.

3. ग्रहण चालू असताना खाणे, पिणे, अंघोळ करणे, बाहेर जाणे ठीक आहे. ग्रहण म्हणजे नेत्रसुखद अनुभव असतो.

काय टाळावे:

1. उघड्या डोळ्याने सूर्य थेट पाहू नका.

2. ग्रहण पाहण्यासाठी एक्स-रे फिल्म किंवा सामान्य गॉगल (अतिनील संरक्षणासह) वापरू नका.

3. ग्रहण पाहण्यासाठी रंगीत काच वापरू नका.

4. हे ग्रहण चुकवू नका.

Previous Post

आगामी पाच वर्षात भारत इलेक्ट्रीक वाहननिर्मितीचे केंद्र बनेल- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

Next Post

शासन प्रशासनाच्या समन्वयाची ‘आमदार छावणी’,शेतकऱ्यांच्या समस्या जागेवरच सोडवण्याचा प्रयत्न

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
आमदार छावणी

शासन प्रशासनाच्या समन्वयाची 'आमदार छावणी',शेतकऱ्यांच्या समस्या जागेवरच सोडवण्याचा प्रयत्न

वन प्लस 8 प्रो

बहिष्कारानंतरही चिनी कंपनीचा लेटेस्ट मोबाइल काही मिनिटांमध्येच झाला ‘सोल्ड आउट’

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.