अकोला,दि.१७- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ९१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७२ अहवाल निगेटीव्ह तर १९ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज सायंकाळी ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील १४ जणांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे तर उर्वरित १७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १०९२ झाली आहे. आजअखेर ३२९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ७६४१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७३२२, फेरतपासणीचे १३३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७६३१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६५३९ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १०९२ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज १९ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सकाळी प्राप्त अहवालात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दोघे अशोकनगर, दोघे अकोट फैल येथील तर उर्वरीत दगडीपुल, आदर्श कॉलनी, जुल्फिकार नगर, बार्शी टाकळी व पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी दहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच पुरुष आणि पाच महिला आहेत. त्यातील पाच जण समतानगर तारफैल येथील, तीन जण खदान येथील तर शिवनी येथील व कारंजा जि. वाशिम येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
३१ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर ३१ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला . त्यात १७ जणांना घरी सोडण्यात आले तर १४ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात २२ पुरुष आणि नऊ महिला आहेत. त्यात जीएमसी क्वार्टर येथील चार जण, गुलजार पुरा येथील तीन, तारफैल येथील दोन, मोठी उमरी येथील दोन, जुने शहर येथील दोन, सिंदखेड ता. बार्शीटाकळी येथील दोन, बेलोदे लेआऊट येथील दोन तर देवी पोलीस लाईन, बाळापूर, गोरक्षण रोड, काळा मारुती, रामदास पेठ, मोहता मिल, बंजारा नगर, लक्ष्मी नगर, गायत्री नगर, अकोट फैल, खदान, वाशीम बायपास, सिव्हील लाईन, शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
३२९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत १०९२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ५६ जण (एक आत्महत्या व ५५ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ७०७ आहे. तर सद्यस्थितीत ३२९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.