वाडेगाव (डॉ चांद शेख)- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव मध्ये जून महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या पॉझिटिव्ह ग्रामस्थाच्या संपर्कातील नागरिकांना बाळापूर नजीक असलेल्या शेळद येथे क्वारटाइन करण्यात आले होते.त्यामधील १५ लोकांची तपासणी करून घरी पाठविण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकरी डॉ भावना हाडोळे यांनि सांगितले आहे.
या १६ पैकी १५ ग्रामस्थांचा अवहाल निगेटिव्ह आल्याने वाडेगाव वासीयांनी सुटकेचा श्वास घेतला.आता एकाचा अवहाल येण्याचे बाकी असल्याचे सुद्धा डॉ कडून माहिती मिळली आहे.वाडेगाव च्या ग्रामस्थानी ही साखळी तोडण्यासाठी दोन दिवस ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी स्वयंपूर्तीने बंद पुकारण्यात आला आहे.या बंद ला गावकऱ्यांनी सहकार्य सुद्ध केले आहे.आज हे ग्रामस्थ अवहाल निगेटिव्ह आल्याने परिसरात आनंद दिसून येत आहे..आता गावकऱ्यांनी घाबरण्याचे काम नसून स्वतः काळजी घ्या आणि अंतर पाळा असे आव्हान सरपंच अन्नपूर्णा मानकर, ग्रामविकास अधिकारी डी एस अंभोरे यांनी केले आहे…