• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना. बच्चू कडू यांची भेट

City Reporter by City Reporter
June 10, 2020
in कोविड १९, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
79 0
0
bacchu kadu visit covid center
12
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१०- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज सकाळी कोविड रुग्णांवर उपचार होत असलेल्या  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. पंजाबराव देशमुख  कृषि विद्यापीठ येथील कोविड केअर सेंटर येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख,  प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, डॉ. शिरसाम तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्था,  स्वच्छता व्यवस्था, कोवीड वार्डातील रुग्णांना दिले जाणारे चहा, नाश्ता भोजन व्यवस्था यांची पाहणी केली. प्रत्यक्ष स्वतः चहा पिऊन  चाचणी घेतली. या चहा मध्ये आलं अवश्य घालावे, अशी सुचनाही त्यांनी प्रशासनाला केली. तसेच जेवणाचा दर्जा उत्तम व  आहारमानकांनुसार असावा अशी सुचना केली.  तसेच जेवणासाठी प्लस्टीक कोटेड वा कागदी पत्रावळी न वापरता नैसर्गिक पानांच्या पत्रावळी वापराव्या अशी सुचना केली. या सुचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी  संबंधितांना दिले.  तसेच सकाळी सात वाजेपर्यंत चहा दिला जावा. आठ वाजता नाश्ता व १२ वाजेपर्यंत जेवण या वेळांचे पालन व्हावे, यासाठी प्रशासनाने काटेकोरपणे सर्व प्रक्रियेवर लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी  दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व परिसराची स्वच्छता उत्तम राखली जावी. इथले वातावरण आल्हाददायक असावे, त्यासाठी सर्व आधुनिक व्यवस्थांचा वापर करा, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,असेही त्यांनी निर्देशित केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पीकेव्ही मधील सेवांबद्दल प्रशासनाचे केले कौतूक

त्यानंतर पालकमंत्री ना. कडू हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील  कोविड केअर सेंटर मधील  निरीक्षणाखालील रुग्णांची भेट घेऊन पाहणी करण्यासाठी गेले. तेथे त्यांची रुग्णांची विचारपूस करुन प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल माहिती घेतली. यावेळी रुग्णांनी इथं दिल्या जाणाऱ्या सेवा, जेवण, जेवणाचा दर्जा , स्वच्छता तसेच वैद्यकीय सेवा ह्या उत्तम असल्याचे सांगितले. यावेळी दाखल रुग्ण व निरीक्षणाखालील रुग्ण यांची माहितीही ना. कडू यांना सांगण्यात आली.  इथं दिल्या जात असलेल्या सेवांबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले व प्रशासनाचे कौतूकही केले.

Previous Post

जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी झाले “गुलाबी”

Next Post

आज २० पॉझिटिव्ह उपचारादरम्यान एकाचा मृत्यु तर १८ जणांना डिस्चार्ज, आकडा ८८४ वर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
corona testing india

आज २० पॉझिटिव्ह उपचारादरम्यान एकाचा मृत्यु तर १८ जणांना डिस्चार्ज, आकडा ८८४ वर

ना. धोत्रे

‘आरोग्यसेतू’चा वापर जनता आणि प्रशासनाच्या हिताचा-केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांचा दूरचित्रवाणी परिषद संवाद

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.