अकोला- जिल्हयात दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनांमध्ये एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. अकोला ते पातूर रस्त्यावर शिर्ला बुद्धभूमीजवळ दोन दुचाकींची अमोरासमोर धडक झाली. यामध्ये एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. मूर्तिजापुरात दोन कारची अमोरासमोर धडक झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला.
चिचखेड बोडखा येथून काम संपवून अतुल सदाशिव तायडे (२२)रा. गोटखेड(जलालाबाद) हे दुचाकीने गावाकडे जात होते. दरम्यान, शिर्ला बुद्धभूमीजवळ समोरून येत असलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. दुचाकी क्र. एमएच ३० टी ७०८५ आणिदुचाकी क्र. एमएच ३० बीके ३४८० यांच्यामध्ये अमोरासमोर धडक झाली. या अपघाता अतुल सदाशिव तायडे यांचा जागेवरच मृत्यू झाला तर आकाश विजय चक्रनारायण व विजय इंगळे हे गंभीर जखमी झाले. या जखमींना तातडीने रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी पाठविले.
राष्ट्रीय महामार्गावर कारची समोरासमोर धडक; एक गंभीर
राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने कारमधील एक जण गंभीर जखमी झाला.आज १२:३० वाजताच्या दरम्यान पंजाबी ढाब्याजवळ घडली.
मूर्तिजापूर अकोला बायपास दरम्यान नागपुर वरुन अकोल्याच्या दिशेने जाणारी एम ३० ए एफ ५३५५ या क्रमांकाची कार रस्त्याच्या कडेला उभी करुन कार मधील व्यक्ती समोरच्या ढाब्यावर खाद्यपदार्थ घेण्यासाठी गेले होते, दरम्यान अकोल्यावरुन विरुद्ध दिशेने येणा?्या एम एच ३८ – १५१० या क्रमांकाच्या कार ने उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली यात कार चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी चालकाला येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.