• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ब्रेकिंग- अकोल्यात माजी उपजिल्हाधिकारी व पत्नीच्या हत्याकांडाचा अकोला पोलिसांनी केला काही तासात पर्दाफाश

Media Desk by Media Desk
June 6, 2020
in Featured, अकोला, अकोला शहर, गुन्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
akola police
17
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- शहरातील बळवंत कॉलनी येथील वृद्ध दाम्पत्याच्या झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बारा तासांतच प्रकरणातील मुख्य सुत्रधारांना बेड्या ठोकल्या आहे. आज (दि. 5 जून) सकाळी नथ्थूराम भगत आणि त्यांची पत्नी हेमलता यांचे मृतदेह घरात जळालेल्या स्थितीत आढळले होते. हत्या झालेले नथ्थूराम भगत हे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आहे. भगत यांच्या घरातील भाडेकरू महिलेनंच चोरीच्या उद्देशानं भावाच्या मदतीनं या दाम्पत्याची हत्या केली.

घरातील भाडेकरू महिलेकडून हत्याकांड

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अकोला शहरातील बळवंत कॉलनी येथे 5 जून रोजी पहाटेच्या सुमारास वृद्ध दाम्पत्यांच्या हत्येनं हादरून गेली. बळवंत कॉलनी येथे 83 वर्षीय सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी नथ्थूराम भगत आणि त्यांची 75 वर्षीय पत्नी हेमलता राहत होते. भगत यांचा मुलगा बँगलोर येथे राहतो. तर एक मुलगी सोलापूरला तर दुसरी अकोल्यात राहते. आज सकाळी भगत यांच्या घरातून भाडेकरू आणि शेजाऱ्यांना धूर निघताना दिसला. यावेळी दरवाजा आतून लावून असल्यानं दरवाजा तोडण्यात आला. मात्र, आतलं दृश्य अतिशय धक्कादायक होतं. दोन पलंगावर नथ्थूराम आणि त्यांची पत्नी हेमलता अर्धवट जळालेल्या स्थितीत पडलेले होते. यातच या दोघांचाही मृत्यू झाला होता. यावेळी अकोल्यात राहत असलेली मुलगी वंदना पाढेन यांना आपल्या आईच्या अंगावरचं सोनं गायब दिसलं. तिथंच त्यांच्या मनात आई-वडिलांच्या मृत्यूबाबत शंका निर्माण झाली.

पोलिसांनीही परिस्थितीजन्य पुराव्यावरून तपासाची चक्रं फिरवलीत. भाडेकरू असणारी महमुदाबी परवीन वसीम हिचं वागणं पोलिसांना संशयास्पद वाटलं. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शैलैंद्र सपकाळ आणि चमूनं वेगानं तपास करीत महमुदाबीचा भाऊ मोहम्मद रफीक मोहम्मद हमजा याला अटक केली. अन् या संपुर्ण ‘मर्डर मिस्ट्री’चा पर्दाफाश झाला. दोन्ही आरोपींनी या दाम्पत्याची हत्या करून त्याला अपघाताचं रूप देण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही आरोपींनी भगत यांच्या घरातील चोरलेलं सोनं आणि रक्कम पकडून 5 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

भगत दाम्पत्यांना आरोपी महिलेवरचा अतिविश्वास नडला

या हत्याकांडातील मुख्य आरोपी ही नथ्थूराम भगत यांच्याकडे भाड्यानं रहात होती. तिनं भगत दाम्पत्याचा यादरम्यान मोठा विश्वास कमावला होता. तिला भगत यांच्याकडच्या पैसे आणि दागिन्यांबद्दल बरीच माहिती होती. यादरम्यान तिनं जूने शहर भागातील इस्लामपुरा भागातील भाऊ मोहम्मद रफीक मोहम्मद हमजा याच्यासोबत मिळून भगत यांच्याकडे चोरीचा कट केला. अन् या कटातूनच या दोघा बहिण-भावांनी भगत दाम्पत्याची हत्या केली. या दाम्पत्याच्या हत्येनं अकोल्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार कंट्रोल रूम अटॅच,पोलीस अधीक्षकांनी केली कारवाई

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अकोटात १५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
akot blood donation

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अकोटात १५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

corona

अकोल्यात पुन्हा निघाले २० पॉझिटिव्ह,आकडा ७४६ वर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.