अकोला,दि.५- जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भाव सद्यस्थितीबाबत आज सायंकाळी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अपूर्व पावडे,डॉ. आंभोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी कोवीड उपचार सुविधांचा आढावा घेतला. वाढत्या रुग्णसंख्येनिहाय सर्व सुविधांची उपलब्धता व अन्य उपाययोजनांबाबत आढावा घेतला. राज्य व केंद्र शासनाकडे ऑनलाईन भरावयाच्या माहिती वेळच्या वेळी अद्यावत करण्याबाबत सुचना दिल्या. तसेच रुग्णांच्या उपचार पद्धतीबाबत आयसीएमआर यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचार पद्धती अवलंब करण्याच्याही सुचना दिल्या. तसेच खाजगी रुग्णालयात नॉन कोवीड उपचार सुविधांबाबत दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत माहिती घेण्यास सांगितले. प्रतिबंधात्मक क्षेत्र, त्यात काम करणारे कर्मचारी व त्यांच्या आरोग्य देखभालीबाबतही त्यांनी स्थानिक यंत्रणांना सुचना दिल्या.