अकोला (प्रतिनिधी)- देशमुख फाईल येथील २७ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्या नंतर त्याला अवघ्या आठ दिवसात चाचणी न करता घरी पाठविण्याचा प्रताप जिल्हा सामान्य रुग्णालय व महापालिका प्रशासनाने केला होता, सदर तरुण काल पुन्हा पॉसिटीव्ह निघाला असल्याने त्याचे कुटुंबाला देखील बाधीत होण्याचा धोका आहे. जिल्हा प्रशासन व शासकीय वैधकीय महाविद्यालयाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे अकोल्यात कोरोनाचा हॉट स्पॉट तयार झाला.बाधीत तरुणाचा विडिओ त्याचा पुरावा असून ह्या गंभीर प्रकरणी दोषीवर कठोर कार्यवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
देशमुख फाईल येथील २७ वर्षीय तरुणा १९ ला स्वॅप शासकीय वैधकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात गेला होता.त्याचा स्वॅप घेऊन त्यास घरी जाऊन विलगीकरणात सांगण्यात आले होते.२१ मे रोजी त्याचा अहवाल पॉसिटीव्ह आल्याने महापालिका अधिकारी व पोलिसांनी त्यास शासकीय वैधकीय येथील वार्ड क्र ३० मध्ये दाखल करण्यात आले. महाविद्यालय रोजी दाखल केरुन घेतल्या नंतर अवघ्या पाच दिवसात २५ मे रोजी त्याला डिस्चार्ज देऊन पीकेव्हीही येथील विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले.पीकेव्हीही येथील केंद्रात काहीही सुविधा नसून थातुरमातुर वैधकीय सेवा असल्याचे सदर तरुणाचे म्हणणे आहे.२५ मे रोजी डिस्चार्ज देताना त्याचे केस पेपर वर मात्र दाखल केल्याची तारीख १ मे आणि डिस्चार्ज दिल्याची तारीख १५ मी अशी टाकून बनावट केस पेपर तयार केल्याचा धोकादायक प्रकार करण्यात आल्याचे हा तरुण सांगत आहे.पॉसिटीव्ह असताना २९ मे रोजी घरी पाठविताना त्याला त्रास कायम होता.त्याकडे दुर्लक्ष करून कोरोना रुग्णाची फेरतापासणी न करता त्याला घरी पाठविण्यात आले.अर्थात पॉसिटीव्ह रुग्ण निगेटिव्ह झाला की नाही ह्याची शास्त्रीय पद्धतीने खातरजमा न करता त्याला घरी पाठविले गेले.
तथापि त्रास कायम असल्याने हा तरुण २ तारखेला पुन्हा शासकीय महाविद्यालयात परतला असता त्याचा अहवाल ३ जूनला पॉसिटीव्ह आला आहे.ह्या प्रकारामुळे त्याचे कुटुंबीय देखील संकटात सापडले आहे.पूर्णपणे बरा न होता त्याला घरी पाठविल्याने त्याचे परिवाराला संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.सोबतच त्याचे कुटुंबाला नाहक जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल व्हावे लागेल किंवा ह्या प्रक्रिये मधून जावे लागणार आहे.अकोल्यात उघडकीस आलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.शासकीय महाविद्यालय व महापालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन रुग्णाच्या जीवाशी खेळत असल्याचे सिद्ध झाले आहे. रुग्ण सापडलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर नागरिक बाधित होत आहेत.परिणामी अकोला कोरोनाचा हॉट स्पॉट बनला असून जिल्ह्यातील रुग्ण मृत्यू दर विदर्भात सर्वाधिक आहे.
जिल्हा प्रशासन व जिल्हा सामान्य रुग्णालय आणि मनपा मध्ये अधिकारीच गंभीर नसल्याने अकोला जिल्हा करीता तातडीने तीन स्वतंत्र आयएएस अधिकारी नोडल म्हणून नेमण्यात यावेत तसेच बाधीत तरुणाची फेरतपासणी न करता घरी पाठविल्या प्रकरणी दोषी विरोधात तातडीने गुन्हे दाखल करून कार्यवाही करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्र्या कडे करण्यात आली आहे.