अकोला: जिल्हा माहिती कार्यालय,अकोला
कोरोना अलर्ट
आज बुधवार दि.३ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-१११
पॉझिटीव्ह-३६
निगेटीव्ह-७५
अतिरिक्त माहिती
आज सकाळी प्राप्त ३६ पॉझिटिव्ह रुग्णापैकी १४ महिला व २२ पुरुष रुग्ण आहेत. त्यातील ११जण अकोट फ़ैल येथील, पाच जण देशमुख फ़ैल येथील, कैलास टेकडी येथील तीन, खदान येथील तीन, न्यू तार फ़ैल येथील तीन तर पाककरपुरा अकोट, अनिकर, वालोदे ले आउट हिंगणघाट रोड, ध्रुव अपार्टमेंट जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर, हिंद चौक, मोठी उमरी, रामदास पेठ, गुलजार पुरा, तार फ़ैल, हरिहर पेठ, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक जण आहेत.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-६६३
मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४६२
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१६७
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!