• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जीएम व एचटीबीटी बियाण्याबाबत कृषिमंत्री व गृहमंत्र्यांशी शेतकरी संघटनेची चर्चा

Team by Team
June 2, 2020
in Featured, राज्य, शेती
Reading Time: 1 min read
77 1
0
discussion of farmers
14
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

नागपूर : जगात जीएम सीडच्या मोठ्या प्रमाणात वापर केला जात असताना भारत सरकारने त्यावर प्रतिबंध लावलेले आहेत. कपाशीचे ‘एचटीबीटी’ वाण महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. हे वाण गुलाबी बोंडअळी प्रतिबंधक असल्याने तसेच उत्पादनखर्च कमी असल्याने ते राज्यातील चोरून वापरत आहेत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहे. शिवाय, त्यांची फसवणूक होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जीएम व एचटीबीटी बियाणे वापरण्याची परवानगी द्यावी तसेच शेतकऱ्यांवर कारवाई करू नका, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने कृषीमंत्री दादा भुसे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी मंगळवारी (दि. 2) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात सकारात्मक चर्चा केली.

साऊथ एशिया बायोटेकचे अध्यक्ष तथा कृषी वैज्ञानिक निवड समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांनी कृषी व गृहमंत्र्यांना बियाण्यांच्या ‘जीएम’ तंत्रज्ञानाबाबत विस्तृत माहिती दिली. कापूस, तेलबिया, डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी या बियाण्याला परवानगी देण्याची गरज असून, जीएम शेतमाल व खाद्यतेल मोठ्या प्रमाणात आयात करत असल्याचे सांगितले. माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केंद्रीय पर्यवरण मंत्री बाबल सुप्रियो यांनी ‘एचटीबीेटी’ अर्थात ‘जीएम’ बियाणे मानवी आरोग्य व पर्यावरणास घातक नाही, असे लोकसभेत स्पष्ट केले होते. हीच बाब माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही लोकसभेत स्पष्ट केली होती. राज्य शासनाने या बियाण्यांच्या ‘ट्रायल’ला परवानगी देऊन ते शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

‘जीएम’ बियाण्यांना सरकारने परवानगी नाकारल्याने बोगस बियाणे बाजारात आणले जाते आणि त्यातून शेतकऱ्यांनी फसवणूक केली जाते, ही बाब शेतकरी संघटनेचे नेते राम नेवले यांनी कृषी व गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. ही फसवणूक थांबविण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहावे, अशी मागणीही त्यांनी केली. चर्चेत सुनील चरपे, शेतकरी संघटना युवा आघाडी प्रमुख सतीश दाणी, तंत्रज्ञान आघाडी प्रमुख विजय निवल, मधुसुदन हरणे सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले. यावेळी शिष्टमंडळाने दादा भुसे व अनिल देशमुख यांच्याकडे निवेदन सोपविले. बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जीएम शेतमालाची आयात

‘जीएम’ तंत्रज्ञान बियाणे जगभर वापरले जात आहे. या बियाण्यांमुळे सोयाबीन व कपाशीसह अन्य पिकांचे उत्पादन वाढले आहे. शिवाय, उत्पादनखर्चही कमी झाला आहे. भारतात या बियाण्यांचा शेतमाल मोठ्या प्रमाणात आयात केला जातो. तंत्रज्ञान बंदीमुळे भारतीय शेतमालाची निर्यात प्रचंड घातली आहे. जागतिक शेतमालाच्या बाजारपेठेत टिकाव धरण्यासाठी तसेच खाद्यतेल व इतर पिकांमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी ‘जीएम’तंत्रज्ञान बियाणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांना ‘जीएम’ तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळाले तर देशात शेतमाल उत्पादनात क्रांती होईल, हा मुद्दा डॉ. सी. डी. मायी यांनी पटवून दिला.

Tags: कृषीमंत्री दादा भुसेगृहमंत्री अनिल देशमुखशेती
Previous Post

टोळ धाडीचे संकट लक्षात घेऊन सतर्कता बाळगण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन

Next Post

अकोट तालुक्यातील पळसोद येथे फावड्याने वार करून एकाची हत्या

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Murder

अकोट तालुक्यातील पळसोद येथे फावड्याने वार करून एकाची हत्या

मूकबधीर

महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या प्रयत्नाने सापडला मूक महिलेचा पत्ता

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.