अकोला,दि.१- आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १०७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ८३ अहवाल निगेटीव्ह तर २४ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या दोन जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित आठ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान काल (दि.३१) रात्री नागपुर येथे संदर्भित केलेल्या महिला रुग्णाचा तर आज दुपारी उपचार घेतांना अन्य महिला रुग्णाचा अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६०५ झाली आहे. तर आजअखेर १२९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ५३७९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५१०४, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६५ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५३६७ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४७६२ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ६०५ आहेत. तर आजअखेर १२ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज २४ पॉझिटिव्ह
आज सकाळी प्राप्त अहवालात १२ महिला व १२ पुरुष असे २४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात पाच जण रामदास पेठ येथील, तीन जण हरिहरपेठ येथील, दोन जण कमलानगर, दोन जण आंबेडकर नगर येथील तर उवरित खैर मोहम्मद प्लॉट, सिंधी कॅम्प, खदान, गुरुनानक नगर कौलखेड, रणपिसेनगर, मुजफ्फरनगर, अनिकुट पोलीस लाईन, नुरानी मशिद जवळ खदान, खडकी, सरकारी गोदाम खडकी, भरतनगर व कोकनवाडी मुर्तिजापूर येथील रहिवासी आहेत.
सायंकाळच्या अहवालात एकही पॉझिटीव्ह अहवाल नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुत्रांनी दिली आहे.
दोघांचा मृत्यू
आज दिवसभरात दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात एक मृत्यू काल रात्री इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचारासाठी संदर्भित केलेल्या ५८ वर्षिय महिलेचा मृत्यू झाला. ही महिला दि.२६ मे रोजी दाखल झाली होती. तिला दि.२९ मे रोजी नागपुर येथे हलविण्यात आले होते, काल दि.३१ मे रोजी तिचा मृत्यू झाला. दरम्यान आज दुपारी उपचार घेतांना ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही महिला फिरदौस कॉलनी येथील रहिवासी असून दि.२९ रोजी दाखल झाली होती. आज तिचा मृत्यू झाला.
१० जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील दोघांना घरी तर उर्वरीत आठ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात तीन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. आज डिस्चार्ज झालेल्या रुग्णांमध्ये दोन जण खदान, शिवाजी नगर, छोटी उमरी, शिवानी नगर वाशीम बायपास, खैर मोहम्मद प्लॉट, तेलीपुरा, माळीपुरा, राजपुतपूरा, नवाबपुरा येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
१२९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ६०५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३४ जण (एक आत्महत्या व ३३ कोरोनामुळे) मयत आहेत. तर आज १० जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ४४२ झाली आहे. तर सद्यस्थितीत १२९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी तीन रुग्ण हे मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत तर एक जण कोविड केअर सेंटरला दाखल आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.