• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 1, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ

प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न ठरला यशस्वी; कोरोना नियंत्रणासाठी सहा हजारांचे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध

City Reporter by City Reporter
May 30, 2020
in विदर्भ, Featured, कोविड १९, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
ias tukaram mundhe nagpur
15
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रभावी  व परिणामकारक नियंत्रणासाठी राष्ट्रीय व राज्यपातळीवर विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे वैद्यकीय सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. नागपूर शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन त्यानुसार आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेऊन विभागातील ५ हजार ८०८ तज्ज्ञ, डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन सज्ज ठेवण्यात आले आहे. त्यामुळे देशातच नव्हे तर राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात यश आले आहे.

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात दहशत निर्माण झाल्यामुळे या विषाणूच्या नियंत्रणासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर आराखडा तयार करण्यात आला आहे. नागपूर विभागात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नागपूरसह पाचही जिल्ह्यांच्या भविष्यातील उद्भवणाऱ्या परिस्थितीचा तसेच लोकसंख्येचा अभ्यास करुन त्यानुसार सर्वंकष आराखडा तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रणासाठी विभागस्तरावर तयार करण्यात आलेल्या वैद्यकीय सुविधांच्या आराखड्यानुसार ३९३ तज्ज्ञ डॉक्टर, १ हजार ९५७ डॉक्टर, २ हजार ४८८ परिचारिका व ९७० वर्ग चारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे. अशा प्रकारे प्रशिक्षण देऊन तज्ज्ञ वैद्यकीय मनुष्यबळ केवळ विभागात उपलब्ध झाले आहे.

कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटिलेटरपासून स्वतंत्र कोविड एअर सुसज्ज रुग्णालय तयार करण्याचा समावेश आहे. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, वर्ध्याच्या सावंगी मेघे वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. कोविड रुग्णांवर उपचारासाठी प्रशिक्षित आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा अभ्यास करुन त्यानुसार राज्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर चालविण्यासह इतर आवश्यक प्रशिक्षण देऊन तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्यात आली आहे.

जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या आयसीयू व एचडीयू सुविधांचा अभ्यास करुन त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करुन त्यानुसार प्रशिक्षण ५ हजार ८०८ वैद्यकीय अधिकारी व संलग्न कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. अशा प्रकारचा उपक्रम राज्यात केवळ नागपूर विभागात राबविण्यात आल्यामुळे नागपूर शहर संपूर्ण विभाग कोरोनावर प्रभावी व परिणामकारक उपचाराच्या सुविधा निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना कोविडसंदर्भात प्रशिक्षण देण्याच्या नियोजनानुसार विभागात २८८ विशेषज्ञ, ९९६  एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टर, २ हजार २८० परिचारिका तसेच ९९६ वैद्यकीय सहाय्यक असे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात यापेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. यासाठी  विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. नागपूर शहरात तसेच जिल्ह्यात १८० विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) ६०० एमबीबीएस, बीएएमएस डॉक्टर, १ हजार ३८० परिचारिका तसेच ६०० चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या  प्रशिक्षणामुळे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशात तसेच राज्यात सर्वाधिक आहे.

शासकीय आरोग्य संस्थांबरोबरच १६ खाजगी रुग्णालये, वेस्टर्न कोल फिल्ड, आयुर्वेदिक महाविद्यालय, महानगरपालिका व जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा तीनपट जास्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा तीन शिफ्टमध्ये सुरु करण्यात आल्या आहेत. कोविड रुग्णालयातील कर्मचारी सतत १५ दिवस कामावर असल्यामुळे त्यांना विश्रांती देऊन त्यांच्या ऐवजी बदली कर्मचाऱ्यांच्या सेवांचा सुद्धा या प्रशिक्षणामध्ये समावेश करण्यात आला आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विभागात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विविध विभागांचे प्रमुख तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद अधीक्षक, आरोग्य यंत्रणेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, महसूल आदी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाखाली विशेष कृती  गट तयार करुन सूक्ष्म नियोजन करुन प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा सज्ज ठेवल्यामुळे नागपूर विभाग हा राज्यात व देशात कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.

Previous Post

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

संशोधकांनी नोवेल कोरोना विषाणूंचे केले कृत्रिम संवर्धन, औषध चाचणी आणि लस विकसित करण्यास ठरू शकते मदतगार

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
Researchers culture novel coronavirus

संशोधकांनी नोवेल कोरोना विषाणूंचे केले कृत्रिम संवर्धन, औषध चाचणी आणि लस विकसित करण्यास ठरू शकते मदतगार

turmeric health

निरोगी राहण्यासाठी चहा ऐवजी घ्या ‘हळदीचे पाणी’

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.