मूर्तिजापूर (प्रतिनिधी)- कोरोना संकटात कुठलाही अधिकारी अथवा कर्मचारी कसुर करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही अशी माहिती विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमोल मिटकरी यांनी मुर्तीजापुर येथे तालुक्याचा आढावा घेण्यासाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधला असताना माहिती दिली.
पक्षाचे टाकलेली अकोला जिल्ह्याची जबाबदारी, विशेष म्हणजे या जिल्ह्याचा नोडल असल्याने कोवीड १९ बाबत तालुकास्तरावर कशी तयारी चालू आहे यासंदर्भात आढावा बैठक घेण्याठी आपण मूर्तिजापूरात आलो आहे.
कोवीड पार्श्वभूमीवर कुठलाही अधिकारी, कर्मचारी कसूर करीत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, या संदर्भात एका डॉक्टरला निलंबित केल्याचे सांगत जिल्हा शल्य चिकित्सक कोवीड व आरोग्याच्या संदर्भात गंभीर नसल्याचा आरोप करीत याची गंभीर दखल घेऊन ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे.
तहसील कार्यालयाची आढावा बैठक आटपून आमदार अमोल मिटकरी यांनी शहरातील उपजिल्हा रुग्णालयास भेट देवून पाहणी केली यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संग्राम भय्या संग्रामभैय्या गावंडे,राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे सर तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर ,शहर अध्यक्ष राम पाटील कोरडे,युवक तालुकाध्यक्ष श्रीधर पाटिल काम्बे,अतुल पाटील गावंडे समाजसेवक रवि राठी,संतोष इंगोले,सागर दादा पुंडकर इत्यादींनी या वेळी भेट दिली….