• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 16, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आनंदाची बातमी! 4 लस वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात; आरोग्यमंत्र्यांची दिलासादायक माहिती

Media Desk by Media Desk
May 25, 2020
in Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली – देश कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सव्वा लाखांहून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर देशभरात 31 मेपर्यंत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसविरोधात अद्याप प्रभावी असं औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. मात्र इतर आजारांवरील औषधांचं ट्रायल कोरोनाविरोधात केलं जातं आहे. देशात कोरोनाची लस तयार करण्यावरही वैज्ञानिक दिवसरात्र काम करत आहेत. त्यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

देशात 14 ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी 4 लसींची लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. हर्षवर्धन यांनी भाजपा नेते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्याशी सोशल मीडियावरून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पाच महिन्यांच्या आत 4 लसींचं क्लिनिकल ट्रायल केलं जाऊ शकतं अशी माहिती दिली आहे.’संपूर्ण जग कोरोनाची लस शोधण्याचे प्रयत्न करत आहे. 100 पेक्षा अधिक जण यावर काम करत आहेत आणि हे काम विविध टप्प्यांवर सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटना या प्रयत्नांचं संयोजन करत आहे. भारतदेखील यावरील लस शोधण्यात सक्रीयरित्या काम करत आहे. भारतात 14 ठिकाणी यावर काम सुरू असून ते विविध टप्प्यात आहे’ अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैव तंत्रज्ञान विभाग नियामक मंजुरी, अनुदान आणि आर्थिक अशा प्रकारे मदत करत आहे असं ही ते म्हणाले आहेत. हर्षवर्धन यांनी ‘माझ्या माहितीप्रमाणे देशातील 14 पैकी ठिकाणी सुरू असलेल्या लसींची येत्या चार ते पाच महिन्यांत क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यात येणार आहे. सध्या त्या सर्व प्री क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यावर आहेत. कोणत्याही लसीची अपेक्षा करणं ही घाई ठरू शकते. लस विकसित करणं ही मोठी प्रक्रिया आहे. लस पूर्णपणे विकसित होण्यासाठी वर्ष लागू शकतं. यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हात धुत राहणं, स्वच्छता राखणं हे त्यावरील उपाय आहेत’ असं सांगितलं आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

Previous Post

अकोल्याने गाठला अखेर चारशेचा टप्पा,पुन्हा ९ पॉझिटिव्ह,आकडा ४०६ वर

Next Post

सौम्य लक्षणांचे रुग्ण वेळीच निदर्शनास येत असल्याने भविष्यातील धोका कमी -जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
Dr. Chavhan

सौम्य लक्षणांचे रुग्ण वेळीच निदर्शनास येत असल्याने भविष्यातील धोका कमी -जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण

raj thackrey

...तर महाराष्ट्रात येताना आमची परवानगी घ्यावी लागेल, राज ठाकरेंचा आदित्यनाथांना कडक इशारा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.