जिल्हा माहिती कार्यालय,अकोला
कोरोना अलर्ट
आज रविवार दि.२४ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-१६९
पॉझिटीव्ह-नऊ
निगेटीव्ह-१६०
अतिरिक्त माहिती
आज सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या नऊ रुग्णांत चार महिला व पाच पुरुष आहेत. त्यातील पाच जण तेल्हारा येथील आहेत. तर उर्वरित राउतवाडी, राजीव गांधी नगर, साईनगर डाबकी रोड, श्रावगी प्लॉट येथील रहिवासी आहेत.
काल रात्री दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते सर्व पुरुष आहेत.या सगळ्यांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले असून त्यात दोघे फिरदौस कॉलनी येथील तर अन्य आळशी प्लॉट, अकोट फ़ैल, खैर मोहम्मद प्लॉट, नानक नगर, इमानदार प्लॉट, समता नगर, मोमीनपुरा, रणपिसेनगर येथील रहिवासी आहेत.
काल रात्री एका ६० वर्षीय महिला रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाला. ही महिला माळीपूरा येथील रहिवासी होती, दि.२० रोजी दाखल झाली होती तिचा काल (दि.२३) रात्री मृत्यू झाला.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३८७
मयत-२४(२३+१),डिस्चार्ज-२२९
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३४
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)