तेल्हारा(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यात कोरोनाने आपला प्रकोप माजविला असून गेल्या दोन महिन्यांपासून भेदू न शकणारा कोरोनाने अखेर बाहेर गावावरून आलेल्या प्रवाशांमुळे अखेर तेल्हारा भेदलेच!
जिल्हयात कोरोनाच्या प्रकोपाने वाढला असून जिल्ह्यात कोरोनाने दहशत माजवली आहे.अशातच सायंकाळी आलेल्या अहवालात तेल्हारा येथील संशयित पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हा अहवाल आला नव्हता मात्र सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान सोशल मीडिया वर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर सुरू झाले तेल्हाऱ्यात भीतीचे वातावरण मात्र अधिकृत अशी माहिती नसल्याने कोणी काही स्पस्ट बोलण्यास तयार नव्हते मात्र प्रशासनाणे ज्या एरिया मधील हे संशयित आहेत ते एरिया सील बंद करण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे नागरिकांच्या मनात ही बातमी खरी ठरली. तर या संशयित रुग्णामध्ये तेल्हारा 2 व बेलखेड येथील एक अशी माहिती मिळाली असल्याने प्रशासन बेलखेड मध्ये एरिया सील करत आहे त्यामुळे ही माहिती जरी अधिकृत नसली तरी खरी ठरवली जात आहे कारण प्रशासन कामाला लागले आहे.तर हे संशयित अकोला घेऊन गेल्याने दुजोरा मिळाला आहे. तेल्हारा येथील नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी हे आवाहन करण्यात येत आहे. तर अवर अकोला च्या चमूने संबंधित अधिकाऱ्याना संपर्क केला असता सदर माहिती मिळाली आहे.