अकोला(दीपक गवई)- कोरोना या संसर्गजन्य आजाराला अटकाव करण्यासाठी शहर हद्दीत लॉकडाऊन जाहिर करूनही नागरिक या ना त्या कारणाने रस्त्यावर येत असल्यामुळे याला रोखण्यासाठी अकोला शहर वाहतूक शाखेने आज पासून पुढील आदेश येई पर्यंत डबसीट फिरणाऱ्या दुचाकीवर कारवाई करण्यात येऊन सदर वाहन जप्त करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिली आहे
कोरोना संसर्गजन्य आजार दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांमध्ये भर पडत आहे. परिणामी चिंताजनक परिस्थिती होत असल्याने अकोला शहरातील रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी एक नवखा प्रयोग अंमलात आणण्याचा निर्णय घेतला असून आज पासून अकोला शहरामध्ये दुचाकीवर एकापेक्षा अधिक बसून वाहन जप्तीची कारवाई होणार आहे. आज दिवस भरात अकोला शहरातील विविध ठिकाणी ५० दुचाकी वर कारवाई करत वाहन जप्त करण्यात आले आहे. अकोला शहरामध्ये दुचाकीवर एकापेक्षा अधिक बसून फिरू नये तसेच चारचाकीमध्ये चालक व अन्य एका व्यक्तीस परवानगी असून त्या व्यक्तीने चालकाचे शेजारी न बसता पाठीमागे बसले पाहिजे. वाहनामध्ये बसताना सोशल डिस्टन्स ठेवणे बंधनकारक आहे. अन्यथा कारवाई केली जाईल.