• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 13, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

१५८ अहवाल प्राप्तः १४ पॉझिटीव्ह, १५ डिस्चार्ज, दोन मयत

Team by Team
May 22, 2020
in कोविड १९, Corona Featured, Featured, अकोला
Reading Time: 1 min read
81 0
0
corona
36
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२२ – आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १५८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४४ अहवाल निगेटीव्ह तर १४ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. काल (दि.२१) आणखी १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर दोन जणांचा मृत्यू झाला,त्यांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ३५५ झाली आहे. तर आजअखेर प्रत्यक्षात १२६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण ३३५५ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ३३३२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २९७७ अहवाल निगेटीव्ह तर ३५५ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व २३ अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आजपर्यंत एकूण ३३५५ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३१०७, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३९ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३३३२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३०८४ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३९ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २९४४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ३५५ आहेत. तर आजअखेर २३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज १४ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात १५८अहवाल प्राप्त झाले. त्यात १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात तीन महिला व पाच पुरुष आहेत. यात दोघा मयत रुग्णांचाही समावेश आहे. उर्वरित रुग्णांपैकी दोघे फिरदौस कॉलनी तर अन्य हिरपूर ता. मुर्तिजापुर, भेंडगाव ता. बार्शिटाकळी, आंबेडकरनगर, गोकुळ कॉलनी येथील रहिवासी आहेत. पैकी भेंडगाव येथील महिला रुग्ण ही मुंबईहून आलेली असून ती वर्धा येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आली होती. आल्यापासून ही महिला गावातील जि.प. शाळेतील अलगीकरण कक्षातच होती.

तर आज सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या सहा अहवालात एक महिला व पाच पुरुषांचे अहवाल आहेत. यात जुने शहर, अकोट फैल, गोकुळ कॉलनी जवाहर नगर, मलकापूर अकोलाहमजा प्लॉट वाशिम बायपास व मुजावरपुरा ता. पातूर येथील रहिवासी आहेत.

दोघे मयत

दरम्यान दोन रुग्ण मयत झाले आहेत. हे दोन्ही रुग्ण हे मंगळवार दि.१९ रोजी दाखल झाले होते. ते त्याच दिवशी मयत झाले. त्यांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील एक रुग्ण ५० वर्षीय महिला असून ती नायगाव येथील रहिवासी आहे. तर अन्य एक ५२ वर्षीय पुरुष असून तो बाळापूर रोड अकोला येथील रहिवासी आहे.

१५ जणांना डिस्चार्ज

तसेच काल (दि.२१) रात्री १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील १२ जण कोवीड केअर सेंटरला निरीक्षणात आहेत. तर तिघांना घरी सोडण्यात आले आहे. त्यात माळीपुरा येथील चार, रेल्वे कॉलनी येथील तीन, लकडगंज येथील दोन, अकोट फैल येथील दोन, तर सिटी कोतवाली, समता नगर, पूरपिडीत क्वार्टर, गुलजारपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

१२६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २३ जण (एक आत्महत्या व २२ कोरोनामुळे) मयत आहेत. काल गुरुवार दि.२१ रोजी रात्री १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या २०६ झाली आहे. तर सद्यस्थितीत १२६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान आजअखेर ३३१८ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १९९८ गृहअलगीकरणात तर १३५ जण संस्थागत अलगीकरणात असे २१३३ जण अलगीकरणात आहेत. तर १०४७ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १३८ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

अधिक वाचा: चौथ्या लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ; २४ तासांत ६ हजार नवे रुग्ण

Tags: अकोलाकोरोनाकोविड १९
Previous Post

चौथ्या लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ; २४ तासांत ६ हजार नवे रुग्ण

Next Post

विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Collector Office

विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

cotton bt seeds

अकोला जि.प.कृषि विभागामार्फत कपाशी बी.टी बियाण्यांवर अनुदान योजनेस प्रशासकीय मान्यता

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.