अकोला, दि.१८ : आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १०८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०४ अहवाल निगेटीव्ह तर चार अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या २६१ झाली आहे. दरम्यान आज सायंकाळी चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजअखेर प्रत्यक्षात १२२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २६१६ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २५२२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २२६१ अहवाल निगेटीव्ह तर २६१ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ९४ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण २६१६ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २३७३, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३४ नमुने होते. आजपर्यंत एकूण २५२२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २२७९ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३४ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २२६१ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २६१ आहेत. तर आजअखेर ९४ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज चार पॉझिटिव्ह
आज दिवसभरात प्राप्त झालेल्या १०८अहवालात १०४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर चार अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात तीन पुरुष व एक महिला आहे. ते फिरदौस कॉलनी,सुभाष चौक रामदासपेठ, मोमीनपुरा ताजनापेठ व सावंतवाडी रणपिसेनगर येथील रहिवासी आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी कळविले आहे.
चौघांना डिस्चार्ज
दरम्यान आज चार जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले. हे चारही रुग्ण राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहेत. यातील एक रुग्ण दि.७ तर अन्य तिघे दि.८ रोजी दाखल झाले होते. त्यांचेवरील उपचार पूर्ण झाल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मिळाली आहे.
१२२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत २६१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १८ जण (एक आत्महत्या व १७ कोरोनामुळे) मयत आहेत. आज सोमवार दि.१८ रोजी चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १२१ झाली आहे. तर सद्यस्थितीत १२२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर २५७४ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १४५७ गृहअलगीकरणात तर ५७ जण संस्थागत अलगीकरणात असे १५१४ जण अलगीकरणात आहेत. तर ९२४ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १३६ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.