• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 4, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

संशयाच्या भुत डोक्यात शिरले आणि पोलिसांना पत्नीच्या मृत्युचे कारण काही वेगळेच सांगितले

Our Media by Our Media
May 22, 2020
in गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
crime
35
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती : पती आणि पत्नीचं नातं विश्वासावर अवलंबून असतं. या नात्यात संशय निर्माण झाला तर हे अतूट नातं कोणतं वळण घेईल याची कल्पना सुद्धा करता येत नाही. असाच प्रकार अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सावनेर येथे घडला आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे.

नांदगावखंडेश्वर तालुक्यातील सावनेर इथं राहणारे देवानंद बुराडे आणि संगीता बुराडे यांचा सुखी संसार सुरू होता. या दाम्पत्याला नऊ आणि सहा वर्षांची दोन मुलं आहे. देवानंद हा गावाजवळील एका पोल्ट्री फार्मवर मजुरी करतो.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

सुखी सुरू असलेल्या त्यांच्या संसाराला अचानक भयंकर वळण आले. देवानंद याच्या डोक्यात संशयाचे भुताने घर केलं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून देवानंद आणि त्याच्या पत्नीमध्ये खटके उडत होते.

दोन दिवसांपूर्वी देवानंद व पत्नी संगीता यांच्या वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीत झाले. रागाच्या भरात देवानंद याने पत्नीचा गळा दाबून खून केला. रागाच्या भरात आपल्या हातून काय घडले याची जाणीव झाल्यावर देवानंद भानावर आला. त्यानंतर त्याने रात्रभर पत्नीचा मृतदेह घरातच ठेवला.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घरात पत्नी मृतअवस्थेत आढळून आली, अशी तक्रार नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली असता सुरुवातील देवानंद आणि त्याच्या शेजारील नातेवाईकांनी कमालीचे मौन बाळगले होते.

मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी देवानंद याची कसून चौकशी केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच देवानंद याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. देवानंद याने पत्नी संगीता बुराडे हीचा दोरीने गळा आवळून खून केल्याचं पोलिसांना सांगितलं

तसंच, गेल्या काही दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय निर्माण झाला होता, त्यातून हे कृत्य केलं असंही त्याने सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ज्या दोरीने संगीताचा गळा आवळून खून केला होता ती जप्त केली आहे. पोलिसांनी आरोपीस देवानंद याला तात्काळ अटक करून खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

Tags: amravati crime news
Previous Post

शेतकऱ्यांनी लोकसहभागातून बनवीला शेत रस्ता

Next Post

पालकमंत्री ना.बच्चु कडु कास्तकारांच्या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देणार का!

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त
Featured

पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त

October 24, 2024
crime
Featured

तेल्हारा तालुका हादरला आठ वर्षीय बालिकेवर नराधमाचा बलात्कार

October 11, 2024
Next Post
akola

पालकमंत्री ना.बच्चु कडु कास्तकारांच्या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देणार का!

akola corona positive update report (4)

अकोल्यात कोरोना रुग्णांचा ओघ उतरता, दिवसभरात दोन पॉझिटिव्ह

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.