• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

लॉकडाऊन काळात प्राण्यांचा छळ केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश

Team by Team
May 14, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
Sanjay khadse
20
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१४- लॉक डाऊन काळात पशु, पक्षी व पाळीव प्राणी यांचे देखभाल करणे, त्यांच्या अन्न व पाण्याची व्यवस्था करुन त्यांची उपासमार टाळण्यास नागरिकांनी प्राधान्य द्यावे तसेच या काळात प्राण्यांना मोकाट सोडून देणे, त्यांना मारहाण करणे असे कृत्य करुन छळ केल्यास तात्काळ गुन्हे करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी निर्गमित केले आहेत.

यासंदर्भात, माननीय सर्वोच्‍च न्‍यायालयामध्‍ये दाखल जनहित याचिकेच्या दि. २१ एप्रिल २०२० च्या निकालपत्रात पशुपक्ष्‍यांची उपासमारी टाळणेबाबत आवश्‍यक कार्यवाही करणेबाबत निर्देशीत केलेले आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

त्यानुसार भारतीय जीवजंतु कल्‍याण मंडळ(AWBI) यांनी लॉक डाऊन काळात प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी सविस्‍तर सुचना दिलेल्‍या आहेत.

१. पाळीव अथवा भटक्‍या प्राण्‍यांना अन्‍न व पाणी व्‍यवस्‍था करणाऱ्या व्‍यक्‍ती/स्‍वयंसेवकांनी स्‍वतःची स्‍वच्‍छता बाळगणे आवश्‍यक आहे.अन्‍न व पाणी व्‍यक्‍ती/स्‍वयंसेवकांना आवश्‍यकतेनुसार विशिष्‍ट वेळा(स्‍लॉट) उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात. तसेच या भटक्‍या प्राण्‍यांना अन्‍न व प्राणी देण्‍याची जागा सार्वजनिक हालचाल नसलेली असावी.
२. भटक्‍या प्राण्‍यांना अन्‍न व पाणी व्‍यवस्‍था करणाऱ्या व्‍यक्‍ती/ स्‍वयंसेवकांनी स्‍थानिक प्राधिकरण, पोलिस विभागासोबत समन्‍वय राखावा व त्‍यांना सहकार्य करावे. लॉकडाऊन च्‍या नियमांचे तसेच कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचे उल्‍लंघन होणार नाही याची दक्षता घ्‍यावी.
३. अन्‍न व पाणी पुरवठ्यानंतर खाण्‍याची भांडी, कागद, मास्‍क, ग्‍लोव्‍ज इत्‍यादी नष्‍ट करण्‍यासाठी कचरा व्‍यवस्‍थापनाच्‍या मानकांचे पालन करण्‍यात यावे.
४. नागरिकांनी भटक्‍या प्राण्‍यांना देण्‍यासाठी घरातील उरलेले अन्‍न कोठेही उघड्यावर टाकू नये. प्राण्‍यांना अन्‍न देण्‍यासाठी विशिष्‍ट जागेची निवड करुन तेथे कचरा व्‍यवस्‍थापनाच्‍या मानकांचे पालन होईल याची काळजी घ्‍यावी. कोरोना विषाणू(COVID-१९) च्‍या संसर्गामध्‍ये पाळीव प्राणी जसे, कुत्रे, मांजर, कोंबड्या इत्‍यादींचा सहभाग नसल्‍याबाबत स्‍थानिक प्राधिकरणामार्फत नागरिकांना प्रबोधन करावे.
५. भटक्‍या प्राण्‍यांना अन्‍न व पाणी व्‍यवस्‍था करणाऱ्या व्‍यक्‍ती/स्‍वयंसेवक हे स्‍वयंस्‍फुर्तीने भारतीय संविधानातील कलम ५१अ(ग) नुसार नागरिकांनी करावयाच्‍या मुलभुत कर्तव्‍याचे पालन करीत आहेत. त्‍यामुळे नागरिक तसेच स्‍थानिक प्राधिकरण यांना विनंती करण्‍यात येते की, त्‍यांना या कामासाठी सहकार्य करावे.
६. विषाणूच्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर प्राण्‍यांना रस्‍त्‍यावर मोकळे सोडुन विनाकारण प्राण्‍यांचे पालकत्‍वाचा त्‍याग करणे, त्‍यांचा छळ करणे व त्‍यायोगे प्राण्‍यांचे उपासमारीस कारणीभुत असणे तसेच अशा प्रकाराने अपघातामुळे त्‍यांच्‍या मृत्‍युस/अपंगत्‍वास कारणीभूत असणे या बाबी प्राण्‍यांना क्रुरतेने वागविण्‍यास प्रतिबंध अधिनियम १९६०, कलम ११(१) चे उल्‍लंघन करणाऱ्या आहेत.
७.लॉकडाऊन च्‍या काळामध्‍ये पाळीव अथवा भटक्‍या प्राण्‍यांचा छळ करणे, त्‍यांना कठीण वस्‍तुने, रॉडने मारहाण होत असल्‍याच्‍या तक्रारी या कार्यालयाकडे व भारतीय जीवजंतु कल्‍याण मंडळाकडे प्राप्‍त होत आहेत. नागरिकांनी अथवा पशुपालकांनी कोणत्‍याही प्राण्‍यांना अशाप्रकारे अमानवी स्‍वरुपाची वागणूक देणे कायद्यानुसार गुन्‍हा आहे. असा प्रकार निदर्शनास आल्‍यास किंवा याबाबत तक्रार प्राप्‍त झाल्‍यास पोलिस प्रशासनाने याची तात्‍काळ दखल घेऊन या कायदयाच्‍या तरतूदी व तत्‍सम अधिनियमानुसार तात्‍काळ कारवाई करावी. याबाबत पोलिस यंत्रणेसह सर्व संबंधितांना कार्यवाही करण्याबाबत निर्देशीत केले आहे,असे अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी आदेशात नमूद केले आहे.

अधिक वाचा: बाळापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जुगार अड्डे जोमात

Tags: अकोलाजिल्हादंडाधिकारी संजय खडसे
Previous Post

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला!

Next Post

अकोल्याचा आकडा दोनशे पार, आज २१ रुग्णांची भर तर १२ जण बरे झाल्याने त्यांची घरवापसी

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
akola corona positive update report (6)

अकोल्याचा आकडा दोनशे पार, आज २१ रुग्णांची भर तर १२ जण बरे झाल्याने त्यांची घरवापसी

akola corona updates

सविस्तर : अकोला दोनशे पार ; ११९ अहवाल प्राप्तः २१ पॉझिटीव्ह, १२ डिस्चार्ज

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.