अकोट (शिवा मगर ): गोवंश चोर हे चार चाकी गाडीने गोवंश चोरून नेत आहेत अशी शंका देवरडा निजामपूर नागरिकांना आली त्यांनी वाहन अडवून त्यांना विचारपूस केली आणि पोलिसांना माहिती दिली परन्तु दहीहंडा पोलीस घटनास्थळी जाणे पर्यंत आरोपी यांनी पोबारा केला होता , दहीहंडा पोलिस स्टेशनमधील राठोड जमादार यांनी आरोपी यांचा 05 किलोमीटर पाठलाग करून एका आरोपी ला पकडले ,
सदर चे घटनास्थळ हे पोलीस स्टेशन दहीहंडा हद्दीतील आहे की तेल्हारा हे निश्चित झाले वर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती आहे
मागील काही दिवसा पासून गोवंश चोरीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे आहे ,याकडे पोलीस विभागाने लक्ष दयावे अशी मागणी नागरिकांना कडून होत आहे