मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोर पालन होण्यासाठी २४ तास आॅन डयूटी रस्त्यावर कर्तव्य बजावणाºया पोलिसांनाच आता कोरोनाचा काही प्रमाणात विळखा पडला आहे. यातच मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात ३० पोलीस अधिकाºयांसह २२७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील ३ पोलीस कर्मचार्यांचा मृत्यु झाला आहे त्यामुळे त्यांच्या संपर्कातील इतर पोलीस अधिकाºयांना आता विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
यामध्ये मुंबईसह सर्वाधिक पोलीसांचा समावेश असून इतर जिल्ह्यातील पोलीस कर्मचायांचा समावेश आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. असे असले तरी भाजी, जीवनावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली बाजारात गर्दी होत आहे. या गर्दीला आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाºयांवर कारवाई करीत असतांनाच पोलिसही कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
याबाबत अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या २२७ पैकी ३० पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे. आतापर्यंत मुंबईतील ३ पोलीस कर्मचार्यांचा मृत्यु झाला आहे. कोरोना बाधित पोलिसांपैकी ६५ टक्के पोलीस हे एकट्या मुंबईतील आहेत.