मुंबई: महाराष्ट्राचे खरा उत्साह साजरा करण्यासाठी भारतातील अग्रेसर विभागीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हेलो ने स्वरूप स्टुडियो आणि चलचित्र कंपनीसोबत भागीदारी करून ‘Vaibhav Maharashtacha’ (#वैभव महाराष्ट्राचं) ही मोहिम चालू केली आहे. हेलोवर को-क्रियेटेड व्हीडियो आणि काही इन-ऍप हॅशटॅग आणि कृतींच्या माध्यमातुन महाराष्ट्राचा अभिमान साजरा करण्याचा या मोहीमेचा उद्देश्य आहे. सुरूवात झाल्यापासून दोन दिवसांच्या आत, #वैभव महाराष्ट्राचं प्लॅटफॉर्मर अग्रेसर आहे आणि आतापर्यंत त्याला 6.5 दशलक्ष इंप्रेशन प्राप्त झाले आहे.
मोहीमेचा भाग म्हणून,मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रेटीज या #वैभवमहाराष्ट्राचं व्हीडियोमध्ये सहभाग घेतील. हे स्टार (सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व) मराठी समाजामधील अनंत उत्साह, स्थिती यांबद्दलची आगळीवेगळी सत्य शेयर करतील, त्यासोबतच व्हिडियो मध्ये चाहते आणि फॉलोवर्स यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतील.
याव्यतिरीक्त, हेलो काही इन-ऍप हॅशटॅगचा वापर करत आहे त्यामध्ये #मराठीकलाकरांचीमानवंदना , #मराठीकलाकार,, #जयजयमहाराष्ट्रमाझा चा समावेश आहे जेणेकरून यूजर मराठी स्टार, हँडलूम्स, पारंपारिक खाद्यपदार्थ, ऐतिहासीक किल्ले आणि स्मारक यांपासून ते मराठी ख्यातनाम व्यक्ती आणि योद्धांपर्यंत त्यांचा विशेष अभिमान व्यक्त करू शकतात. उत्सवाच्या उत्साहात भर म्हणून, हेलो काही प्रश्नमंजुषा, पझल, आवडीच्या वास्तविक गोष्टी, यूजरसाठी थ्रो बॅक पोस्ट सुद्धा आणणार आहे आणि यूजरला व्यस्त ठेवणार आहे.
#वैभवमहाराष्ट्राचं बद्दल बोलतांना सोनाली कुळकर्णी म्हणाली, “महाराष्ट्राच्या भव्यतेला मानाचा मुजरा देणे आणि तो साजरा करण्यासाठी या एकत्रीकरणाचा भाग मी असल्याचा मला फार आनंद आहे. जरी एक गाणे चित्रीत करण्यासाठी आणि न्याय करण्यासाठी पुरेसे नाही, तरीसुद्धा, आपल्या मातृभुमीला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या लॉकडाउन मध्ये आपण एकत्र येत आहोत (सर्वजण आपापल्या घरून). हा इतिहास आहे, संस्कृती आहे,वारसा आहे आणि आपला खजिना आहे.“
या सहकार्याबद्दल बोलतांना, निर्माता (स्वरूप स्टुडियोचे मालक) आकाश पेंढारकर म्हणाले, “महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्रीय लोकांसाठी जीवनातील महत्वपूर्ण दिवस आहे. या प्रसंगी आम्हाला काहीतरी असे करायचे आहे जे सर्वांच्या लक्षात राहील आणि मराठी लोकांसाठी फायद्याचे असेल. हेलोच्या भागीदारीमध्ये हा व्हीडियो, आपल्या संस्कृती आणि वारस्याला आदरांजली देईल. यामुळे मराठी समाजाला हा शुभ प्रसंग साजरा करण्यामध्ये हा प्लॅटफॉर्म मदत करेल अशी आम्हाला आशा आहे.“
दिग्दर्शक हेमंत ढोमे (चलचित्र चे मालक) पुढे म्हणाले, “चलचित्र कंपनीमध्ये आम्ही नेहमीच अभिमान, धैर्य आणि शौर्याने लोकांना एकत्रित ठेवण्यावर विश्वास ठेवला आहे – जे मराठ्यांचे मत आहे. तोच उत्साह ठेवून, आम्ही हेलो सोबत एकत्र येऊन आणि #वैभव महाराष्ट्राचं ची सुरूवात करून आनंदी आहोत. सांस्कृतिक विविधता आणि आपल्या श्रद्धेला रुजवून ठेवण्यासाठी आमचे राज्य आणि त्यामधील लोक यांचे आभार मानण्यासाठी हा व्हीडियो आहे. हेलो ऍपच्या माध्यमातुन मराठी बोलणारे प्रेक्षकांमध्ये आमच्या आवडत्या यूजरसाठी सकारात्मकता निर्माण करणे आणि हा दिवस अविस्मरणीय बनवणे हा आमचा उद्देश्य आहे.”
मराठी ही हेलो वरील सर्वात प्रसिद्ध भाषा आहे जी समविचारी लोकांच्या अभिमान बाळगतात आणि जे मराठी लोक विविध सामग्री स्वरूपांमध्ये एकमेकांशी संवाध साधतात. या उपक्रमाच्या माध्यमातुन, उदासीन भावना दूर करणे आणि यूजरमध्ये सकारात्मकता निर्ममाण करणे हा हेलोचा प्रयत्न आहे.