हिवरखेड(बाळासाहेब नेरकर)- ओजस्वी भजनातून जनमानसात नवचेतना निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हिवरखेड येथील किशन किरण सेदानी व प्रज्वल प्रदीप चिंचोळकर या विद्यार्थी युवकांनी प्रेस क्लब यांच्या सौजन्याने अत्यल्प खर्चात सॅनिटायझर डिस्पेन्सर मशीन तयार करून आरोग्यवर्धिनी,हिवरखेड (प्राथमिक आरोग्य केंद्र) येथे भेट स्वरुपात दिली आहे. यावेळी प्रथमतः जि.प. सदस्या सौ.सुलभा दुतोंडे, सरपंच सौ.अरुणा ओंकारे, पं.स.उपसभापती प्रतिभा इंगळे पं.स.सदस्या सौ.गोकुळा भोपळे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या फोटोला हारार्पण करण्यात आले. त्यानंतर सॅनिटायझर डिस्पेन्सर मशीनचे लोकार्पण ठाणेदार आशिष लव्हंगळे यांच्या हस्ते करून वैद्यकीय अधिकारी चव्हाण साहेब व ठाकरे मैडम यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सोपविण्यात आली. यावेळी संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीचे महेंद्र कराळे यांनी किशन व आदित्यच्या कृतीचा आपल्या मनोगतातून गौरव केला. यावेळी किशनने या मशिनच्या निर्मितीबद्दल सांगतांना मशीन अत्यंत अल्पदरात तयार होत असून प्रत्येक वेळेस पाहिजे तेव्हढे सॅनिटायझर हातावर घेतले जाईल त्यामुळे त्याचा अपव्यय होणार नाही, अशी माहिती दिली. तसेच त्याने मशीन हाताळणीचे प्रात्याक्षिक करून दाखविले. अल्पदरात तयार करण्यात आलेली हि मशीन कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी हि मशीन विविध कार्यालयात उपयुक्त असल्यामुळे हि उपलब्ध होणेसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रेस क्लब चे संस्थापक श्यामशील भोपळे यांनी केले. या कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन असतांना घरी राहा सुरक्षित राहा या आवाहनाला परीसाद देत या युवकांनी अत्यावश्यक सेवेसाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबतचा आरोग्य केंद्रामध्ये तपासणीसाठी येणारे रुग्ण यांच्यासाठी हि मशीन उपयुक्त ठरणार आहे. याप्रसंगी माजी सरपंच सुरेश ओंकारे, माजी पं.स.सदस्य रमेश दुतोंडे,ग्रामसेवक भीमराव गरकल, महेन्द्र भोपळे, विलास घुंगड, सतीश इंगळे प्रेस क्लबचे अध्यक्ष बलराज गावंडे, जेष्ठ पत्रकार किरण सेदानी, गोवर्धन गावंडे, केशव कोरडे, जितेंद्र लाखोटीया, गजानन दाभाडे,प्रा.संतोष राऊत,रितेश टीलावत,मनीष भुडके,राजेश अस्वार, बाळासाहेब नेरकर,सुनील बजाज, सुदाम राऊत, ज्ञानेश्वर गावंडे,प्रशांत भोपळे,संजय मानके यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका व स्टाफ, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आदींचे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून उपस्थिती व मार्गदर्शन मिळाले . या तरुण युवकांनी घरी राहा, सुरक्षित राहा व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी कार्यशिल राहा हा कानमंत्र या स्वयंनिर्मित सॅनिटायझर डिस्पेन्सर मशीनच्या माध्यमातून दिला आहे.