अकोला, दि ३०: वार्ताहार तसेच पोलिसावर जीवघेणा हल्ल्याला काही तास उलटत नाही काल रात्री बाळापूर तालुक्यातील तामशी येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यां ट्रॅक्टरने ग्रामस्थांनी बैलगाडी, खुर्च्या लावून बंद केलेल्या रस्त्यावरील बैलगाडी सर्वांसमक्ष उडविल्याची खळबळजनक घटना घडली आहे.ग्रामपंचायतचे वतीने रात्री पोलीस तक्रार करण्यात आली असता ठाणेदार शिंदे यांनी सरपंच पतीला फोनवर शिविगाळ केल्यामुळे वंचित बहूजन आघाडीने ठाणेदार शिंदे विरोधात गृहमंत्री, पोलीस अधीक्षक यांच्या कडे तक्रार करीत कार्यवाहीची मागणी केली आहे.
कोरोनाचे पार्श्वभूमीवर ग्राम तामशी येथे उपविभागीय अधिकारी यांचे आदेशानुसार ग्रामपंचायत चे वतीने रस्ता बंद करण्यात आला आहे.रस्त्याच्या बाजूला बैलगाडी व खुर्च्या लावून वाहतूक बंद करून तेथे ग्राम पंचायत कर्मचारी यांची ड्युटी लावण्यात आली आहे.काल रात्री गावातील सरपंच पती, ग्राम पंचायत कर्मचारी व इतर ग्रामस्थ उपस्थित असताना रेती ची अवैध वाहतूक करणाऱ्यां ट्रॅक्टरने सर्वांसमक्ष बैलगाडी उडवून लावली.ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून बाजूला धाव घेतल्याने कुणालाही इजा झाली नाही.गावक-यांनी ट्रैक्टर पकडून पोलीस स्टेशन, तहसिलदार व जनप्रतिनिधि यांना ह्या घटनेची माहिती दिली.जिप सदस्य राम गव्हाणकर यांनी ठाणेदार शिंदे यांना कॉल करून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली असता वैतागून ठाणेदार शिंदे यांनी चार कर्मचारी पाठविले.पोलीसांना यायला उशिर झाल्याने ट्रैक्टर चालकाने पळवुन नेला.आलेल्या पोलीस कर्मचारी यांना ट्रैक्टर व ट्रैक्टर मालक याची घर दाखवून देण्यास तयार असताना पोलीस कर्मचारी यांनी थातूरमातूर चौकशी केली.खिल्लारे नामक पोलीस कर्मचारी यांच्या फोनवर बोलताना ठाणेदार शिंदे यांनी सरपंच पती विजय पातोडे ह्यांस अश्लील शिवीगाळ केली. सर्वांना फोन करून माहिती का दिली म्हणून दम दिला.पोलीस ठाण्यात जावून तक्रार कर असे सांगून फोन ठेवला.रात्री उशिरा ग्रामस्थांनी बाळापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.मात्र पोलीसांनी कुणालाही अटक केली नाही.
ठाणेदार शिंदे यांच्या विरोधात तक्रार करणार वंचित बहूजन आघाडी.
दोन दिवसात रेती माफियांनी पत्रकारावर जीवघेणा हल्ला व पोलीस कर्मचारी ट्रैक्टर ने चिरडून ठार केलेला असताना बाळापूर ठाणेदार यांनी काल केलेली वर्तणूक निषेधार्ह असून रेती माफियांला पाठीशी घालणारी आहे.प्रत्यक्ष घटनास्थळी जावून देखील बाळापूर पोलीस कार्यवाही करीत नसतील आणि उलट जनप्रतिनिधि व इतरांना कॉल करून माहीती दिली म्हणून हरामखोरा वगैरे शिवीगाळ करणा-या ठाणेदार शिंदे विरोधात तातडीने कारवाई करावी अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
राज्यात संचारबंदी असताना वाळू माफियांना मात्र कायद्याची भीती राहिलेली नाही. अकोल्यात त्यांनी हैदोस घातला असून पत्रकार पद्माकर लांडे व पोलीस कर्मचारी सिरसाट
यांच्यावर वाळूमाफीयांनी काल प्राणघातक हल्ला केला होता.ह्या खुनी हल्ल्या नंतर काही तासातच तामशी येथे वाळू माफियानी बैलगाडी उडवून पळ काढला आहे. वाळु चोरी करून गब्बर झालेल्या या मस्तवाल वाळू माफियांना पोलीस, पत्रकार व महसूल विभाग यांची जराही भिती राहिलेली नाही. त्यामुळे ते राजरोसपणे रेती चोरी करीत आहेत. त्यावर कारवाई केल्यास थेट हल्ला करण्या इतपत त्यांची मजल जाते. या हल्याचा वंचित बहूजन आघाडीने निषेध व्यक्त केला असून वा़ळू माफीया व ठाणेदार शिंदे विरोधात कठोर कारवाईची मागणी केली मुख्यमंत्री,गृहमंत्री जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना ईमेल व्दारे वंचित बहूजन आघाडीने केली आहे.