अकोला- ऑफिसर्स क्लब ही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या विरंगुळा व सकाळ- सायंकाळच्या व्यायामाची जागा. या जागेत असणारी श्वान मंडळी ही दररोजच्या येण्या जाण्यात ओळखीची आणि त्यातून जिव्हाळ्याची झाली हे कळलंच नाही. दररोजच्या या श्वानांना पोटभर बिस्कीट व अन्न देण्याची जबाबदारी आपसूकच अधिकारी वर्गाने घेतली होती. पण लॉक डाऊनच्या काळात हे क्लब बंद करावे लागले. त्यामुळे तेथील येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ बंद झाली. मात्र याचा परिणाम तेथील या इमानदार पाळीव कुत्र्यांवर होऊ देण्यात आला नाही. या अधिकाऱ्यांनी या सर्व कुत्र्यांच्या उदरभरणाची व्यवस्थाही या कालावधीत सुरळीत सुरु ठेवली आहे.
अकोला जिल्हा ऑफिसर क्लब बॅडमिंटन क्लब च्या सदस्यांनी ऑफिसर क्लब च्या भागांमध्ये राहणाऱ्या या कुत्र्यांना संचार बंदीच्या कालावधीत बिस्किट देऊन त्यांची भूक भागवली जातेय. बॅडमिंटन ग्रुपचे सदस्य मनीष अडतिया, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे वर्षभर दररोज त्या भागातील मुख्य प्राण्यांना, बिस्कीट ची व्यवस्था करतात.संचारबंदी च्या कालावधीत बॅडमिंटन खेळणे बंद आहे मात्र दररोज प्रमाणे त्यांना सकाळी बिस्कीट मिळाली पाहिजे यासाठी ही सगळी खेळाडू व अधिकारी, सदस्य मंडळी सकाळी तेथे भागांमध्ये जाऊन तेथील मुक्या प्राण्यांना बिस्किट्स खाऊ घालतात. आता रोज सकाळी हे प्राणी त्यांची वाट पाहत उभे असतात. हे लोक तिकडे जाताच ते जमा होतात. मग खाऊ वाटप होऊन त्यांच्या उदरभरणाची व्यवस्था केली जाते. मग हे सर्व अधिकारी व खेळाडू आपापल्या दैनंदिन कामकाजाला निघतात. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व सभासद व अन्य खेळाडू मनीष, अडतिया, संजय पिंपळकर, पराग अडतिया, सुरेश कुलकर्णी, शरद भोसले, अनुराग धोंगडे, किशोर धाबेकर, व शेख हाजी व्यवस्थापक ऑफिसर्स क्लब हे ही भूतदया जोपासत आहेत.
अधिक वाचा: वाडेगावात लिंबू उत्पादकांना फटका, लॉकडाऊनचा फटका, शेतकरी हवालदिल