वाडेगाव(डॉ चांद शेख): बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेले वाडेगाव लिंबू उत्पादन घेण्यासाठी प्रसिद्ध असून येथील लिंबू उत्पन्न देशाच्या मुख्य बाजारपेठ मध्ये विकायला जाते. परंतु आज रोजी कोरोना या संसर्गजन्य अजरामुळे संचारबदी लागू झाल्याने वाडेगावात खरेदी विक्री बंद आहे. हे विक्री बंद असल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील लिंबू झाडालाच पिकून खाली गळत असल्याचे चित्र आहे. या लॉकडाऊणचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
लिंबू या फळाला उन्हाळ्यात बाजार पेठमध्ये मोठी मागणी असते. परंतु आज रोजी खाजगी व्यापाऱ्याकडून योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही जर कृषी विभागाने या प्रकाराकडे लक्ष घातले आणि ई पास ची जर व्यापाऱ्यांना व्यवस्था करून दिली तर कदाचित मालविक्री होऊ शकते . आपल्या स्थानिक बाजारपेठेत वेळेला खूप गर्दी होते काही कारणाने कदाचित प्रशासन आपल्याला परवानगी देत नसेल पण सर्व शेतकऱ्यांनी जर कृषी विभागाकडे आपल्या मालाच्या संदर्भात मागणी केली तर व्यापाऱ्यांना येथून माल घेऊन बाहेर विक्रीसाठी पाठवता येणे शक्य आहे, खाजगी व्यापारी यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे ,हजारो रुपयाचे लिंबू (फळ) हे नाश होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.या प्रकाराकडे प्रशासनाने दूर्लक्ष केले असून या लिंबू उत्पादक शेतकऱ्याची काळजी घेऊन या फळाची विक्री करता येईल व शेतकऱ्याची आर्थिक टँचाई दूर होईल अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
आमच्या शेतातली झाडाला लिंबू मोठ्या प्रमाणात आले असून लिंबूचे फळ झाडालाच पिकुन खाली गळत आहे.लिंबूच्या बाजारपेठ बंद असल्याने यावर्षी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अनिरुद्ध हिमत्तराव घाटोळ लिंबू उत्पादक युवा शेतकरी वाडेगाव
व्यापाऱ्याकडून योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही जर कृषी विभागाने या प्रकाराकडे लक्ष घातले आणि ई पास ची जर व्यापाऱ्यांना व्यवस्था करून दिली तर कदाचित मालविक्री होऊ शकते.खाजगी व्यापारी यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
दादाराव मानकर शेतकरी