जळगाव जा: यावर्षी देश मोठ्या नैसर्गिक आपत्तीत सापडणार असून भरपूर पाऊस होणार आहे. पीक परिस्थिती साधारण राहील. तर अतिवृष्टी भरपूर होईल .देशाचा राजा कायम राहील मात्र त्याच्यावर प्रचंड ताण असेल. संरक्षण व्यवस्था मजबूत असली तरी शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. त्यामुळे सर्वांनी संघटित होऊन देशावर येणार्या संकटासी लढा करावा लागेल, असे भाकीत भेंडवळ घटमांडणी केले आहे.
सुप्रसिद्ध भेंडवळ घटमांडणी केवळ चार लोकांच्या उपस्थितीत करण्यात आली या घटमांडणी चे भाकीत अखेर आज दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी केले.
घटामध्ये ठेवलेल्या करव्यावरील पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी पूर्णतः गायब होती. त्यामुळे संपूर्ण विश्वात नैसर्गिक संकटे येतील कुठे कृत्रिम आपत्ती येईल. परकीय शत्रूपासून घुसखोरी आतंकवादी कारवाया सुरू राहतील. साथीचे आजार पसरून जग त्रस्त होईल. अनेक ठिकाणी महापूर येतील. प्रचंड अतिवृष्टी होईल. भूकंप त्सुनामी सारखी संकटे देशावर सांगितली आहेत.
पावसाळ्यातील चार महिन्यांमध्ये भरपूर पाऊस पडणार आहे त्यामुळे पीक परिस्थिती साधारण सांगितलेली आहे. यावर्षी कुलदेवतेचा प्रकोप देशावर आहे. तर जनमानसावर तसेच पिकांवर सुद्धा रोगराई चे कमीअधिक प्रमाण राहील. चारा पाण्याची टंचाई भासणार आहे. संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. परंतु त्यांच्यावर खूप ताण येईल .या सर्व गोष्टींचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल त्यामुळे देशाची आर्थिक तिजोरी खाली होऊन देश आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे आजच्या भाकितमधून वर्तविली गेली आहे.
जनजीवन संकटात येईल
एकंदर पाणी पावसाने पिके वगळता इतर संकटांची या वर्षात मोठी सरबत्ती राहील त्यामुळे जनजीवन संकटात येईल.. त्यासाठी सर्वांनी संघटितपणे राहून संकटावर मात करण्याची गरज निर्माण होणार आहे असे धक्कादायक या वर्षी भेंडवडची घटमांडणीतून बाहेर आले आहेत.
भेंडवळची घटमांडणी कशी केली जाते?
दरवर्षी अक्षयतृतीयेला सूर्यास्तापूर्वी गावाबाहेर शेतात वाघ घराण्याचे वंशज घटाची मांडणी करतात. घटामध्ये अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा गोलाकार मांडली जातात. घटाच्या मध्यभागी खोल खड्डा करुन त्यात पावसाळ्याच्या 4 महिन्यांचे प्रतिक असलेली 4 मातीची ढेकळे ठेवली जातात. त्यावर पाण्याने भरलेली घागर, घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोळी, कुरडई, तर खाली विड्याच्या पानावर सुपारी ठेऊन प्रतिकात्मक मांडणी केली जाते.
दुसर्या दिवशी सूर्योदयापूर्वी या घटात झालेल्या बदलावरुन भविष्य वर्तवण्यात येते. पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरुपातील पुरी, समुद्राचं प्रतिक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांचीही मांडणी केली जाते. त्यानंतर दुसर्या दिवशी घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन भाकित वर्तवलं जातं. आतापर्यंत हे भाकित वयोवृध्द रामदास वाघ हे कथन करायचे. मात्र, त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र पुंजाजी महाराज आणि सहकारी सारंगधर वाघ हे भविष्य कथन करतात.