घोडेगाव(विकास दामोदर): तेल्हारा लगत ग्राम घोडेगाव येथे सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंद्याने नांदतात येथे सर्व लोक एकमेकांच्या उत्सव समारंभात हिरिरीने सहभागी होतात.
आज अक्षय तृतीया निमित्त तथा मुस्लिम बांधवांच्या रमजान महिना यातच विजेचा लपंडाव यामुळे लोकांना पुरेशे पिण्याचे पाणी मिळत नव्हते, प्रा. प्रदिप ढोले यांनी यांच्या मार्गदर्शनात सरपंच रवींद्र दामोदर ग्राम विकास अधिकारी श्री. राजू थिटे यांनी गावातील ज्या ज्या भागात पिण्याचे पाणी पोहचत नाही तिथे टँकर द्वारे लोकांना पाणी पुरविले यामधे विशेष योगदान माजी सरपंच नासिर मामू, यांनी आपली विहीरीवरील मोटरपंप खुला करून दिला तर प्रा. विकास दामोदर यांनी आपल्या ट्रॅक्टर द्वारे लोकांना पाणी पुरविले.
अशा प्रकारचे वेगवेगळे जनहिताचे प्रयोग घोडेगाव येथील लोकनेते प्रा. प्रदिप ढोले, अतुल ढोले, नासिर मामू, रवींद्र दामोदर हे राबवित असतात कोरोनामुळे गरीब लोकांवर उपासमारी वेळ येऊ नये यासाठी प्रा. प्रदिप ढोले, डॉ. तैसीन मिर्झा हिम्मत दामोदर गुरुजी यांनी गरजुंना किराणा वाटप केला.
अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम घोडेगाव येथे राबविले जातात त्यामुळेच जिल्ह्यात सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता यासाठी घोडेगाव ग्राम एक खूप मोठं मूर्तिमंत उदाहरण आहे.