• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत एकाने वाढ; सिंधी कॅम्प परिसर प्रतिबंधित

City Reporter by City Reporter
May 23, 2020
in Corona Featured, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
akola-corona-update-3-april-2020
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२६– जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे १२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील एक रुग्ण पॉझिटीव्ह असून उरलेले सर्व ११ निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत एकाने वाढ झाली आहे. आज पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा अकोला शहरातील सिंधी कॅम्प भागातील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान रुग्ण ज्या भागातील आहे तो सिंधी कॅम्प व पक्की खोली परिसर प्रतिबंधित केल्याचे, आदेश उपविभागीय दंडाधिकारी  डॉ. निलेश अपार यांनी जारी केले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण ५३९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ५३६ अहवाल आले आहेत.  आजअखेर एकूण ५१९ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत व  तीन अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

आजपर्यंत एकूण ५३९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४१९, फेरतपासणीचे ८२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५३६ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४१६ तर फेरतपासणीचे ८२ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३८ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५१९ आहे. आज प्राप्त झालेल्या १२ अहवालात एक पॉझिटीव्ह तर ११ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच बैदपुरा भागातील रहिवासी असलेला जिल्ह्यातील पहिल्या रुग्णाचा पाचवा व सहावा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे, अशी माहितीही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत देण्यात आली आहे. त्यामुळे  उपचार करणाऱ्या यंत्रणेस काहीसा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात आता एकूण कोवीडबाधीत रुग्णसंख्या १७ झाली आहे. त्यातील दोघे मयत झाले. गुरुवारी (दि.२३) सात जणांना घरी सोडण्यात आले. आज एकाच्या पॉझिटीव्ह अहवालाची भर पडल्यामुळे आता आजअखेर आठ रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे. उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

आजअखेर जिल्ह्यात तीन अहवाल प्रलंबित असून ते तिनही अहवाल प्राथमिक आहेत. जिल्ह्यात आज अखेर बाहेरुन आलेल्या ५६२ प्रवाश्यांपैकी  २२२ जण गृह अलगीकरणात तर ७८ जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण ३०० जण अलगीकरणात आहेत. २४० जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

सिंधी कॅम्प परिसर प्रतिबंधित

आज पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा  सिंधी कॅम्प भागातील पक्की खोली परिसरातील रहिवासी असल्याने आता सिंधी कॅम्प व पक्की खोली परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी आज जारी केले आहेत. आता या भागातील रहिवासी बाहेरील भागात व बाहेरील व्यक्ती या भागात जाऊ अथवा येऊ शकणार नाहीत. या भागातील  प्रत्येक घरी जाऊन आरोग्य तपासणी केली जाईल.  तसेच या व्यक्तीच्या संपर्कांचाही तपास करण्याचे काम सुरु झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

दरम्यान जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. आजाराची कोणतीही  लक्षणे दिसल्यास  ती लपवू नका. तात्काळ डॉक्टरांना वा  शासकीय दवाखान्यात दाखवा. लक्षणे लपवून राहू नका. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नका. बाहेर पडतांना मास्क लावा.  कोणाही व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवा. घरी आल्यावर साबणाने हात धुवा. स्वच्छता राखा असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.

Tags: corona akola updatesindhi camp akola
Previous Post

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

३ मे नंतर लॉकडाऊनबाबत जिल्ह्यांची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेणार- मुख्यमंत्री

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
cm-uddhav-thakrey-maharashtra-cm

३ मे नंतर लॉकडाऊनबाबत जिल्ह्यांची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेणार- मुख्यमंत्री

corona-test-lab

यवतमाळमध्ये कोरोनाचा उद्रेक; कोरोना पॉझिटिव्ह रूग्‍ण संख्या ५० वर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.