अकोला- महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यात सद्यस्थितीत २७५३ मजूरांची ६१३ कामांवर उपस्थिती आहे. आजच्या घडीला जिल्ह्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ही कामे सुरु आहेत. शासनाने एक एप्रिल पासून रोहयो कामांच्या मजूरीचा दरही २३८ रुपये प्रतिदिन इतका केला असल्याने अधिकाधिक मजुरांनी ग्रामपंचायतीकडे जाऊन कामाची मागणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
यासंदर्भात रोहयो विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, अन २०२०-२१ या वर्षासाठी शासनाने मजूरीचा दर हा २३८ रुपये इतका केला आहे. जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत स्तरावर सेल्फ वरील कामे १२ हजार ५०५ इतकी आहेत तर यंत्रणास्तरावरील कामे १५४० आहेत, असे एकूण १४ हजार ४५ कामे आहेत. त्यासाठी सर्व नोंदणीकृत मजुरांनी संबंधित ग्रामपंचायतीत रोहयो सेवकास संपर्क करुन आपली कामाची मागणी नोंदवावी. या योजनेअंतरेगत घरकुल बनविणे, वनविभागाच्या रोपवाटीका तयार करणे, वृक्ष लागवड, तूती लागवड, गुरांचा गोठा उभारणे, सिंचन विहीर, विहिर पुनर्भरण इ. कामे सुरु आहेत. जिल्ह्यात सध्या २७५३ मजूर कामांवर हजर आहेत. जिल्ह्यात १०५ ग्रामपंचायतींमध्ये ६१३ कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील नोंदणीकृत मजुरांनी कामाची मागणी करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
अधिक वाचा: बॅंका, वित्तीय संस्थांच्या वेळेत आजपासून बदल