अकोला- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर अकोला शहरातील सध्या प्रतिबंधित असलेल्या बैदपूरा, अकोट फैल तसेच संलग्न परिसरात जीवनावश्यक वस्तुंच्या ठोक व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. तेथे शहरातील अन्य भागातील लहान मोठे व्यावसायिक माल खरेदी करण्यासाठी जा ये करीत असतात. त्यामुळे संसर्ग फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात असणारे जीवनावश्यक वस्तूंचे ठोक व्यापाऱ्यांनी शहरातील अन्य भागातील किरकोळ व्यापाऱ्यांना माल पुरविण्यासाठी शहराच्या अन्य भागातून पर्यायी व्यवस्था करावी, असे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी दिले आहेत.
स्वस्त धान्य दुकानदारांनाही निर्बंध
प्रतिबंधित क्षेत्रातील काही स्वस्त धान्य दुकानदारांकडे प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील शिधापत्रिकाधारक लाभारर्थी जोडलेले आहेत. ते प्रतिबंधित क्षेत्रात येऊ नये यासाठी या या भागातील स्वस्त धान्य दुकानदारांनी लहान वाहनातून बाहेरील शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करावे. कोणत्याही परिस्थितीत बाहेरील शिधापत्रिकाधारक हे प्रतिबंधित क्षेत्रात येता कामा नये तसेच ते अन्नधान्यापासून वंचितही राहता कामा नये असे आदेश डॉ. अपार यांनी दिले आहेत.
अधिक वाचा: विशेष लेख; कोरोना प्रादुर्भाव काळात ज्येष्ठांनी घ्यावयाची काळजी