अकोला- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर तालुकास्तरावर कोवीड १९ केअर सेंटर स्थापन करुन त्याचे व्यवस्थापन योग्य रितीने व्हावे यासाठी तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
या समितीचे अध्यक्ष तहसिलदार असून त्याचे सदस्य सचिव तालुका आरोग्य अधिकारी आहेत. तर गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक, उपायुक्त (अकोला शहर), मुख्याधिकारी नगरपरिषद, नगरपंचायत या प्रमाणे समितीची रचना असेल. या समितीने तालुकास्तरावरील कोवीड केअर सेंटर करीता आवश्यक सोई सुविधांची उपलब्धता करुन त्याचे व्यवस्थापन करावयाचे आहे,असेही आदेशात नमूद केले आहे.
अधिक वाचा: जिल्ह्यात २११ पैकी १६१ जणांचे अहवाल प्राप्त, १४८ निगेटिव्ह; ५० प्रलंबित