अकोट (तालुका प्रतिनिधी: शिवा मगर): कोरोना मुळे होणारे विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन 30 एप्रिल पर्यत वाढविण्यात आले आहे. अकोल्या जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या एकूण १२ एवढी झाली असुन अनेक व्यवसायाच्या दृष्टीने व बाजारपेठ असलेल्या अकोट शहरात कोरोना संशयित म्हणून अकोला नेले असुन सतर्कता म्हणून मुंडगावील रस्ते नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन बंद केले आहे .गल्ली,वाड्यात प्रवेश करण्यासाठी असलेले विविध रस्ते नागरिकांनी अडवून बंद केले आहे.
कोरोना सारख्या जिव घेण्या आजाराचे संसर्ग होऊ नये या करिता शासनाच्या वतीने विविध प्रकारचे उपाय-योजना राबविण्यात येत असुन नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून आपल्या घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोबतच नागरिकांनी विना कारण घरा बाहेर पडू नये,जिवना आवश्यक वस्तू घेतांना गर्दी करू नये व सोशल डिस्टन पाळावा असे प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी सांगण्यात येत आहे अनेक व्यवसायाच्या दृष्टीने गल्ली,वाड्यात येणारे रस्ते बाबूं च्या माध्यमातून सतर्कता म्हणून बंद केली आहे.