अकोला- जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना बाधीत रुग्ण नसला तरीही प्रशासनाने पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्ह्यात ६९० खाटांची सोय असलेले २४२ क्वारंटाईन कक्ष सज्ज ठेवले आहेत. हे क्वारंटाईन कक्ष घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.
तयार केलेले क्वारंटाईन कक्ष याप्रमाणे-
अकोला-
१) गुणवंत (स.क.) मुलांचे वसतीगृह, संतोषीमाता मंदिराजवळ (३० कक्ष ६० खाटा)
२) समाजकल्याण मुलींचे वसतीगृह, संतोषीमाता मंदिराजवळ (२० कक्ष ४० खाटा)
३) आदिवासी मुलांचे वसतीगृह कृषि नगर(१७ कक्ष ५० खाटा)
४) सैनिकी मुलांचे वसतीगृह शास्त्री नगर(१५ कक्ष ५० खाटा)
५) सैनिकी मुलींचे वसतीगृह शास्त्री नगर (८ कक्ष ३० खाटा)
६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह, कृषि नगर (१५ कक्ष ३० खाटा)
अकोट-
१) आयटीआय इमारत वसतीगृह,पोपटखेड रोड(८ कक्ष २० खाटा)
२) नवीन ग्रामिण रुणालय इमारत (१६ कक्ष ५० खाटा)
तेल्हारा-
१) तहसिल कार्यालयाची नवीन इमारत(५ कक्ष २० खाटा)
मुर्तिजापूर-
१)पॉलिटेक्निक कॉलेज इंआरत. अमरावती रोड (९० कक्ष २०० खाटा)
२)समाज कल्याण इमारत(४ कक्ष ७० खाटा)
बार्शी टाकळी-
१)दोन क्वार्टर्स-(४ कक्ष १० खाटा)
बाळापूर-
१)डी.एड कॉलेज इमारत (२ कक्ष २० खाटा)
पातूर-
१)ढोणे बीएएमएस कॉलेज – (४ कक्ष २० खाटा)
२) आयटीआय इमारत (४ कक्ष २० खाटा)
असे एकूण २४२ कक्ष स्थापण्यात आले असून त्यात ६९० खाटांची सोय करण्यात आली आहे.ही सर्व क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत.