• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

धान्य वाटपाबाबत पुरवठा विभागाचे दिशानिर्देश

City Reporter by City Reporter
May 26, 2020
in राज्य, शेती
Reading Time: 1 min read
78 0
0
धान्य वाटपाबाबत पुरवठा विभागाचे दिशानिर्देश
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: कोरोना विषाणू (COVID-19) च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पात्र लाभार्थींना माहे एप्रिल ते जुन या महिन्यांचे धान्य वाटपाबाबत दि.३१ मार्च रोजी शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अशा विविध योजनांद्वारे कशा पद्धतीने धान्य वितरण होईल याबाबतची कार्यप्रणाली व दिशानिर्देश जिल्हा पुरवठा विभागाने जारी केले आहेत.

त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय योजनेतील सर्व पात्र लाभार्थींना नियमितपणे मिळणारे धान्य गहु दोन रुपये प्रति किलो  व तांदुळ तीन रुपये प्रति किलो या दराने एप्रिल, मे व जून या महिन्याचे धान्य त्या त्या महिन्यातच रास्तभाव दुकानांमधुन वाटप केले जाईल.  त्याचप्रमाणे शासनाने घोषित केल्याप्रमाणे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय योजनेमधील पात्र लाभार्थ्यांनाच प्रति व्यक्ती प्रति माह पाच‍ किलो तांदुळ मोफत देण्यात येईल.

हेही वाचा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

धान्य वाटप  झाल्यानंतर ज्या पात्र लाभार्थ्यांनी नियमित धान्य उचल केली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत वितरण सुविधा ePos मशीनवर उपलब्ध झाल्यानंतर त्या त्या महिन्यात मोफत वितरीत करण्यात येईल,असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे. धान्य घेतांना  लाभार्थ्यांनी गर्दी करु नये तसेच परस्परात अंतर राखूनच धान्य घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल , मे व जुन महिन्यासाठी सिलेंडर मोफत मिळणार आहे. लाभार्थ्याच्या बँक खात्यात दि. चार पासुन सिलेंडरची मुळ किंमत केंद्र शासन जमा करेल. सिलेंडर घेतांना ती रक्कम  संबधीत कंपनीच्या गॅस एजन्सीला द्यावी. प्रत्येक महिन्यात लाभार्थांच्या खात्यात त्या त्या महिन्याची सिलेंडरची मुळ रक्कम जमा होईल.  प्रधानमंत्री उज्वला गॅस लाभार्थ्यांनी आपले बँक अकाउंट अद्यावत (update) करुन घ्यावे ही एजन्सीधारकांचीही संयुक्त जबाबदारी असेल.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उद्योग व्यवसायातील कामगार,  परराज्यातील  विस्थापित कामगार व बेघर व्यक्ती यांच्यासाठी निवारागृह व अन्न, पाणी तसेच वैद्यकीय देखभाल या सुविधा स्वयंसेवी संस्थाच्या सहाय्याने केंद्रीय किचन व्यवस्थेच्या माध्यमातुन शिजवलेले/ शिजवण्यासाठी तयार अन्नाचा पुरवठा करण्याकरीता कम्युनिटी किचनमार्फत भोजन व्यवस्था करतांना संबधित संस्थांना धान्याचा शासकीय दराने गव्हाचा पुरवठा करण्यात येईल,असेही कळविण्यात आले आहे.

Tags: COVID-19उज्वला गॅस योजनाराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना
Previous Post

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट-अन्न,नागरी पुरवठा विभागाचे स्पष्टीकरण

Next Post

६२ पैकी ३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह; ३० प्रलंबित

RelatedPosts

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
Next Post
corona ward file photo

६२ पैकी ३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह; ३० प्रलंबित

Market

अकोटात प्रशासनानचे आदेशाला जनतेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.