अकोला: रिझर्व बँकेने कोरोना (कोबीड-१९) व्हायरस संसर्गाच्या अनुषंगाने अल्प,मध्यम,व दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाच्या दि. एक मार्च ते ३१ मे या कालावधी मधील कर्जाचे परतफेडीसंबंधी करावयाच्या उपाय योजना बाबत मार्गदर्शक सुचना कळविल्या आहेत.तसेच देशात संपूर्ण लॉकडाऊन, संचारबंदी आणि कलम १४४ लागु करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिक कर्ज मुदतीत भरणा करण्यास होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या सुचना जारी करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार, अल्प मुदती पिक कर्जे ही बँकेने संमत केलेल्या प्रचलित धोरणानुसार सन २०१९-२० खरीप पिकासाठी असलेली कर्ज परतफेडीची अंतीम मुदत दि.३१ मार्च ऐवजी दि.३० जून करण्यात आली आहे. हा बदल फक्त सन २०१९-२०२० या हंगामाकरीता लागु असेल. तसेच जे शेतकरी खरीप पिकासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड माहे मार्च २०२० अखेर करतील अशा सभासदांना तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर केंद्र,राज्य व बँके मार्फत व्याज सवलत योजनेचा लाभ मिळेल. त्याचप्रमाणे जे शेतकरी खरीप पिकासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड माहे जुन २०२० अखेर करतील अशा सभासदांना तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर बँके मार्फत व्याज सवलत योजनेचा लाभ मिळेल.
तर मध्यम मुदती/दिर्घ मुदती विकासात्मक कर्जांबाबतच्या सुचना याप्रमाणे- ज्या मध्यम/दीर्घ मुदतीच्या विकासात्मक कर्जाचे हप्ते दि.१ मार्च ते ३१ मे या कालावधीत वसुलपात्र आहेत अशा हप्त्यांना ड्यु डेट पासुन पुढील ३ महिन्याचा सवलतीचा कालावधी (मोरेटोरीअम पिरेड)देण्यात येत आहे. या कर्जाचा उर्वरीत परतफेड कालावधी ३ महिन्याने वाढवण्यात येत आहे. तथापी कर्ज खात्यावरील घेणे बाकीवर व्याज आकारणी करण्यात येईल. याप्रमाणे कर्ज परतफेड तारखेमध्ये करण्यात आला असून त्यानुसार बॅंकांनी कर्ज वसूली करावी,असे निर्देश प्राप्त झाले आहेत.