तेल्हारा (प्रतिनिधी) – तेल्हारा नगरपालिके मध्ये काम न करता बिले काढल्या जात असल्याचा खळबळ जनक आरोप जनतेच्या समस्यांप्रती जागृत असलेल्या भाजपच्या नगरसेविका सौ आरती गजानन गायकवाड यांनी केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली ?
तेल्हारा प्रशासन यांनी तेल्हारा पालिके मध्ये पारदर्शक कारभार चालवू असे आश्वासन पत्रकार परिषद घेऊन तेल्हारा वासीयांना दिले होते .परंतू काही दिवसांतच तेल्हारा पालिकेमध्ये विविध विकास कामांन मध्ये व निविदान मध्ये काही घोळ झाल्याचे दिसून येत आहे. तश्या तक्रारी सुध्दा झाल्या होत्या त्यामुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तेल्हारा शहरातील प्रभाग क्र.८ मधिल इंदिरा नगर मध्ये स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत ४ महिण्याअगोदर स्वच्छलय सुधारण्याची कामे चालू होती त्यातीलच इंदिरा नगर येथिल स्वच्छ्या लयावर लाईट, नळ व पाण्याची टाकी बसविण्यात आली होती. यातच या स्वच्छलयात २० ऍक्झ्याट फॅन बसवायचे होते परंतु सदर फॅन न बसविता गेली दोन महिने अगोदर या सर्व कामांची बिले निघून सुध्दा या स्वच्छतागृहात ऍक्झ्याट फॅन बसविण्यात आले नाही. पर्यायी दुसरीच व्यवस्था करण्यात आली असल्याचा खळबळजनक आरोप नगरसेविका सौ आरती गजानन गायकवाड यांनी करून तसे निवेदन नगर परिषद अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना देऊन ऍक्झ्याट फॅन लवकरात लवकर बसविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या सर्व प्रकारावरून तेल्हारा नगर परिषद मध्ये कसा पारदर्शक कारभार चालतो हे दिसून येत आहे. कारण एका जबाबदार नगरसेविकेने केलेला आरोप हा खरा असू शकतो या आरोपामुळे व या पूर्वी सत्ताधारी भाजपचे गट नेते नरेश गंभीरे यांनी अध्यक्ष यांच्या मनमानी कारभारामुळे गटनेते पदाचा दिलेला राजीनामा तसेच सत्ताधारी न. प. उपाध्यक्ष सौ . मालुताई खाडे यांनी सुध्दा या पूर्वी नगराध्यक्षा च्या विरुद्ध केलेली तक्रार, तसेच आपल्या रास्त मागण्यांसाठी सत्ताधारी नगरसेवकांनी नगरपालिकेवर काढलेला मोर्चा या सर्व बाबींमुळे नगरपालिकेचा कारभार कसा ढेपाळला हे दिसून येते.
विकास कामांची चौकशी होणार काय ?
तेल्हारा नगपालिका क्षेत्रा मध्ये पालिकेच्या माध्यमातून झालेल्या व होत असलेली कामे अंदाजपत्रका प्रमाणे झाली की नाही याची कसून चौकशी केल्यास फार मोठे घबाळ बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच या काही दिवसात काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रिया नियमानुसार झाल्या की नाही कंत्राटदारांना नियमानुसार वर्क ऑर्डर दिल्या गेली कि नाही याची सुध्दा कसून चौकशी झाल्यास गैरप्रकारांन बाबतची सत्यता बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एका जागृत नगरसेविकेने केलेल्या आरोपामुळे पालिकेचे अधिकारी व पदाधिकारी विकास कामांची पारदर्शक पणे कसून चौकशी करतील काय असा प्रश्न तेल्हारा शहरातील नागरिक उपस्थित करू लागले आहेत.