तेल्हारा (प्रतिनिधी)- कुणबी युवक संघटना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने १२ मार्च ला संत तुकाराम महाराज चौकातून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बिजोउत्सव व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तेल्हारा शहरामधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभयात्रे मध्ये भक्ती संग शक्तीच्या नामाचा गजर व टाळ मृदुनगाच्या गजराने तेल्हारा नगरी दुमदुमली शोभायात्रे मध्ये विविध देखावे ,गोंधळी सादरीकरण व कोरोना बाबत जनजागृती करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कुणबी युवक संघटनेच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बिजोउत्सव व छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तेल्हारा शहरातील मुख्य मार्गाने भव्य शोभायात्रा करण्यात आली शोभायात्रेची सुरुवात संत तुकाराम महाराज चौकात,सौंदरीकरन येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली त्यानंतर अग्रेशन टॉवर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतड्याचे पूजन करण्यात आले या वेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज कि जय, छत्रपती शिवाजी महाराज कि जय जय भवानी जय शिवराय असे नारे देऊन नामाचा गजर करण्यात आला या वेळी शिवसेनेच्या वतीने कुणबी युवक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचा भगवी शाल घालून सत्कार करण्यात आला शोभायात्रे दरम्यान टॉवर चौक, संताजी चौक, भिम नगर, प्रताप चौक, जय बजरंग चौक, धर्मवीर संभाजी चौक, श्री शिवाजी चौक इत्यादी ठिकाणी चहापाणी निंबुशरबत देऊन स्वागत करण्यात आले.
शोभायात्रे मध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनची वेशभूषा सुरज कुयटे या बालकाने साकारली होती तर छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा छोटू तायडे, विठ्ठलाची प्रथमेश खारोडे, रुख्मिणीची वैष्णवी खारोडे, मावळ्यांची ओम डोगरे, स्वरीत दबळघाव, पियुष सावळे, मनोज चाके दिपक वानखडे ,सचिन मोहोड यांनी साकारली होती. शोभा यात्रे मध्ये समोर दोन घोडे त्यावर छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा धारण केलेले युवक, एका ट्रॅक्टर वर संत तुकाराम महाराज, विठ्ठल ,रुख्मिणी व मावळ्यांची वेशभूषा धारण केलेली झाकी दुसऱ्या ट्रॅक्टर वर तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील गोपाल महाराज भंडारे, सागर भंडारे, सोनू भंडारे, कु. मिरगे यांनी गोंधळ सादरीकरण केले या पथकातिल गोधळ सादर करणार्यांनी सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते. तिसऱ्या ट्रॅक्टर वर कोरोना बाबत जनजागृती करणारा देखावा व मोठया फलकावर त्यावरची माहिती व उपाय योजना बाबत माहिती लिहिली होती शोभायात्रे मध्ये संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवलेली पालखी होती टाळ मृदुनगाचा गजर व ढोलाचे भजना मुळे तेल्हारा नगरी दुमदुमून गेली होती या वेळी भक्ती संग शक्तीचा संगम पहावयास मिळाला.
तेल्हारा व थार येथील ढोलाचे भजन तसेच भांबेरी, गाडेगाव, वरुड ,बाभूळगाव, टाकळी पंच येथील टाळकरी मोठया संख्येने शोभायात्रे मध्ये सहभागी झाले होते शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली या यात्रेत भाविक भक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते हि शोभायात्रा काढण्या करिता कुणबी युवक संघटनेच्या तेल्हारा तालुका व शहर अध्यक्ष त्याचे सर्व पदाधिकारी व संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या वेळी ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख होता.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0