अकोला(प्रतिनिधी)- सोलापूर येथील खासदार स्वामी सिध्देश्वर यांना बनावट जातीचा दाखला सह लोकसभा निवडणुकीत ऊभे करणा-या भाजपची पक्ष नोंदणी रद्द करण्यात येणे गरजेचे आहे. तसेच निवडणूक खर्च व महाराज यांच्या वर खासदार म्हणून केलेला सर्व खर्च, सवलती महाराज व भाजपा कडून संयुक्तपणे वसुल करून भाजप प्रदेशाध्यक्षांना फसवणूक गुन्हात सहआरोपी करण्याची मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
खोटे जात प्रमाणपत्र काढून लढणे हा गुन्हा आहे तसेच पक्षाच्या एबी फॉर्म वर आरक्षित जागेवर बनावट उमेदवार ऊभा करून देशातील नागरिक, निवडणूक आयोग व संविधानाच्या विरोधात वर्तन केले आहे. सबब भाजपा पक्षाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात यावे.निवडणूक खर्च, तसेच महाराज यांनी खासदार म्हणून लाटलेल्या सवलतीचा खर्च सिध्देश्वर व भाजप यांचे कडून व्याजासहित वसूल करावा आणि भाजपा पक्षाची नोंदणी रद्द करण्यात यावी.
सोलापुरात बनावट जात प्रमाण पत्र प्रकरणात केवळ दोन अधिकारी व महाराज असे तीनच आरोपी करण्यात आले आहे. त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष यांना सुध्दा सहआरोपी करण्यात यावे, अशीही मागणी राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.लवकरच तक्रारकर्त्यांशी संपर्क साधून सहआरोपी करणे, खर्च वसुली आणि भाजपची निवडणूक नोंदणी रद्द करण्यासाठी तक्रारी दाखल करण्यात येणार असल्याचे पातोडे यांनी सांगितले आहे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0