अमरावती- अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात प्रेम प्रकरणातून सहा जानेवारी ला एका १८ वर्षीय महाविद्यायलीन तरुनीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. एकतर्फी प्रेमप्रकरनातून एका माथेफेरूने तिची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर या माथे फेरूने स्वतःही घाव मारून घेतले होते. दरम्यान माझ्या मुलीच्या हत्येमागे ठाणेदारच असल्याचं धक्कादायक आरोप तरुणीच्या आईने केला होता.
त्याआधारावर ठाणेदार रवींद्र सोनवणे यांची चौकशी लावण्यात आली होती.
चौकशी अहवालात ठाणेदार रवींद्र सोनवणे याने मुलीच्या घरी जाऊन तिच्याशी जवळीक साधल्याचे समोर आले. प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न सोनवणे याने केला असल्याचं चौकशी अहवालामध्ये स्पष्ट झाल्याचं समोर आलंय. त्यामुळं ठाणेदार रविंद्र सोनवणे याला दोषी असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्याच एका पोलीस अधिकाऱ्यांने एका तरुणीचा छळ केल्याने आता पोलिसांच्या विश्वासार्हतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तरुणीच्या हत्येच्या काही दिवसा पूर्वी आरोपी सागर तितुरमारे याच्या विरोधात तक्रार देऊनही ठाणेदार रवींद्र सोनवणे यांनी कुठलीही कारवाई केली नाही. असा आरोप पीडित तरूनीच्या आईने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कडे केला होता.त्यावेळी तक्रार दाखल करून ठाणेदार यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.
हत्येच्या काही दिवसा अगोदर पासून ठाणेदार हा माझ्या मुलीला भेटायला व जबरदस्तीने जेवायला घरी येत होते.तसेच ते तिला वारंवार फोन करून त्रासही देत होते.
तिला कॉलेज मध्ये भेटायला जात होते. वेगवेगळ्या नंबर वरून ठाणेदार माझ्या मुलीला त्रास देत होता असाही गंभीर आरोप हत्या झालेल्या तरुणीच्या आईने केले होते.
त्यानंतर या हत्याकांडाचा तपास दत्तापूर ठाणेदार रवींद्र सोनवणे यांच्याकडून काढून त्याला निलंबित करण्यात आले होते.
आणि हा तपास मोर्शीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फरताळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता . मागील अनेक दिवसांपासून या ठाणेदाराची चौकशी सुरू होती आज या चौकशीचा अहवाल समोर आला असून या अहवाला मध्ये ठाणेदाराने त्या पीडित मुलीशी जवळीक साधल्याच चौकशी तून समोर आल्याने आता या ठाणेदाराला आरोपी करून त्याला अटक करण्यात आली आहे.