पातुर(सुनील गाडगे)- महाराष्ट्र शासनाने दिनांक 13 जुलै 2019 रोजी जाहिरात क्रमांक 04 व 05 अन्वये महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक 5000 व उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता 2000 अशा एकूण 7000 पात्र उमेदवारांच्या अर्जाची मागणी केली होती. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील लाखो आयटीआय धारकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरले व सदरची भरती ही जाहिरात निघाल्यापासून 45 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे ऊर्जामंत्री यांचे आदेश होते. परंतु, सदर जाहिरात निघून अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद होऊन तब्बल सात ते आठ महिने होऊन देखील कोणतीही अडचण नसतांना सदरची भरती प्रक्रिया शासनाच्या व महावितरणच्या निष्काळजी व दिरंगाईमुळे आज पर्यंत पूर्ण केलेली नाही.
सदरची भरती पूर्ण होत नसल्यामुळे लाखो आयटीआय धारक भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची गेल्या सात ते आठ महिन्यांपासून वाट पाहत आहेत. परंतु भरती पूर्ण होत नसल्याने आज लाखो विद्यार्थ्यावर बेरोजगारीची वेळ आलेली असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, विलंबामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा निघून जात आहे.व त्यांच्यामध्ये निराशेचे वातावरण निर्माण होत आहे. तसेच अनेक विद्यार्थी बेरोजगार असल्यामुळे त्यांनी ऊर्जामंत्री व वेगवेगळे मंत्री यांना निवेदनाद्वारे सदरची भरती तात्काळ पूर्ण करण्याबाबत विनंती केलेली आहे. तरी देखील भरती प्रक्रिया पूर्ण करीत नसल्यामुळे आयटीआय धारक विद्यार्थी महावितरण व शासनाच्या धोरणावर होत असून शासन व महावितरण यांनी सदर भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केले नाही तर आयटीआय धारक शासन विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.व मुंबई येथील प्रकाशगड येथे 4 मार्च रोजी आमरण उपोषणास बसणार आहेत.अशी माहिती (जिल्हा अकोला)तालुका पातुर अ.भा.वि.प चे नगरमंत्री स्वप्नील इंगळे यांनी पत्रकारांना दिली.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.