अकोला दि.16 : प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बीजीई सोसायटीची निवडणूक तुल्यबळ झाल्याचे रविवारी रात्री हाती आलेल्या निकालावरून स्पष्ट झाले. या निवडणुकीत अॅड.मोतीसिंह मोहता आणि डॉ. आर. बी. हेडा यांच्या पॅनलने 9 जागांवर विजय मिळविला तर राजीव बियाणी यांच्या पॅनलला 8 जागा मिळाल्या.
बीजीई सोसायटीच्या निवडणुकीत 357 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार होते, यापैकी रविवारी पार पडलेल्या मतदानात 315 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 8.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतर सायंकाळी आरएलटी महाविद्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला. अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, ज्येष्ठ उपाध्यक्ष, कनिष्ठ उपाध्यक्ष, मानद सचिव, सहसचिव या पाच पदाधिकार्यांसह 12 सदस्य अशा एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. राजीव बियाणी यांचे विद्याविकास पॅनल आणि अॅड.मोतीसिंह मोहता आणि विद्यमान अध्यक्ष डॉ.आर.बी. हेडा यांच्या ज्ञानगंगा पॅनलची सरळसरळ लढत झाली. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अगोदर 12 कार्यकारिणी सदस्यांची मते मोजण्यात आली. यामध्ये दोन्ही पॅनलचे प्रत्येकी 6 उमेदवार विजयी झाले. यामध्ये अजय कांत (213), डॉ.किरण लढ्ढा (196), डॉ. सतीश राठी (193), विक्रम गोलेच्छा (191), अतुल बंग (178), अमित सुरेका (184), करण चिमा (161), अजय गुप्ता (156), दीपक चांडक (150), प्रमोद अग्रवाल (148), रमेशचंद्र चांडक (148) आणि अभय बिजवे (146) यांचा समावेश आहे.
कार्यकारिणी सदस्यांची मतमोजणी आटोपल्यानंतर रात्री 11.30 वाजता अन्य पदाधिकार्यांची मतमोजणी सुरू झाली. यामध्ये ज्येष्ठ उपाध्यक्षपदी विजय तोष्णीवाल (160) , कनिष्ठ उपाध्यक्षपदी डॉ. रवींद्र जैन (166), मानद सचिवपदी पवन माहेश्वरी (171), सहसचिवपदी अभिजित परांजपे (162) विजयी झाले. सर्वात शेवटी अध्यक्षपदासाठीची मतमोजणी करण्यात आली. राजीव बियाणी आणि अॅड. मोतीसिंह मोहता यांच्यामध्ये काट्याची लढत झाल्याचे यावेळी स्पष्ट झाले. या लढतीत अॅड. मोतीसिंह मोहता यांनी 187 मते घेऊन बाजी मारली. राजीव बियाणी यांना 126 मते मिळाली. रात्री 2 वाजेपर्यंत ही मतमोजणी चालली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. उल्हास कविश्वर यांनी काम पाहिले.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8