तेल्हारा (किशोर डांबरे)- तेल्हारा शहरामध्ये श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती तेली समाज बांधवांकडून मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. दि. १० जानेवारी शुक्रवार रोजी तेली समाजाच्या वतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी शहरातील मुख्य मार्गावरून सदर शोभायात्रा काढण्यात आली होती.
यामध्ये जगनाडे महाराज यांच्या शोभायात्रेत भव्य अशी प्रतिमा, तसेच भजनी मंडळी तसेच समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. टावर चौक स्थित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारापर्ण करण्यात आले. यावेळी कुणबी युवक संघटना तेल्हारा शहर व तालुका यांच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करून व चहा वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी कुणबी युवक संघटना शहर तालुका अध्यक्ष नाना भाऊ इंगोले, शहर कार्याध्यक्ष किशोर भाऊ डांबरे, शहर अध्यक्ष स्वप्नील सुरे, रामा भाऊ फाटकर, गजानन गायकवाड, मंगेश ठाकरे, निलेश जवकार, नाना भाऊ इंगोले, संदीप भाऊ खारोडे, विशाल फाटकर, विशाल नांदोकार, संजय ठाकरे, विठ्ठल मामणकार, दीपक मोडक, रतन मोहनकार, आकाश फाटकर, ज्ञानेश्वर अवारे इत्यादी हजर होते.