अकोला : अकोला जिल्हा परिषदेचे निकाल जाहीर झाले आहेत. गेल्या वीस वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या भारिप बहुजन महासंघाने यावेळी देखील सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. तर जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.
मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. अकोल्यात अनेक बोलणी करून सुद्धा महाविकास आघाडी स्थापन होऊ शकली नाही आणि त्यामुळेच जिल्ह्यात भाजप, सेना आणि भारिप बहुजन महासंघ हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे ही निवडणूक लढले आहेत. भारिप बहुजन महासंघला सत्तेपासून रोखण्याकरिता सर्वच पक्षांनी मोठी कस लावली होती. मात्र विरोधकांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले…
लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. 27 च्या आकड्यासाठी आम्ही इतर पक्षांशी बोलणी करू आणि सत्ता स्थापन करू असे भारिप बहुजन महासंघाचे प्रवक्ता धैर्यवर्धन फुंडकर यांनी म्हटले आहे.
भाजपच्या केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. मात्र भाजपला या निवडणुकीत जोरदार फटका बसलाय मागील निवडणुकीत 12 जागा मिळवणाऱ्या भाजपला या निवडणुकीत 7 जागांवर समाधान मानावा लागलाय.
अकोल्यात शिवसेनेने मुसंडी मारत 13 जागा मिळवल्या तर काँग्रेस जैसे थे च्या स्थितीत राहिली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांच्या जागेत वाढ झाली आहेय…एकंदरीत मागील निवडणूकीचे निकाल पाहता भाजप आणि भारिप बहुजन महासंघला फटका बसला आहे. तरीही सर्वात मोठा पक्ष भारिप बहुजन महासंघ म्हणून समोर आला असून प्रकाश आंबेडकरांनी गड राखण्यास यश मिळवला आहेय…
2013 आणि 2019 चा निकाल
अकोला जिल्हा परिषद २०१३ तील पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 52
पक्ष जागा
१) भारिप-बहुजन महासंघ 24
२) भाजप 12
३) शिवसेना 08
४) काँग्रेस 04
५) राष्ट्रवादी काँग्रेस 01
६) अपक्ष 03
अकोला जिल्हा परिषद 2019 निकाल…एकूण 53 जागा
१) भारिप बहुजन महासंघ : 22
२) शिवसेना : 13
३) भाजप : 7
४) राष्ट्रवादी : 3
५) काँग्रेस : 4
६) अपक्ष : 4
नफा – तोटा
भाजप – तोटा 5 जागांचा
शिवसेना – नफा 5 जागांचा
भारिप बहुजन महासंघ – तोटा 2 जागांचा
काँग्रेस – न नफा न तोटा
राष्ट्रवादी काँग्रेस – नफा 02 जागेचा
अपक्ष – नफा 1 जागेचा..
सर्वात मोठा पक्ष म्हणून भारिप बहुजन महासंघ समोर आलं असलं तर सत्ते स्थापनेसाठी लागणाऱ्या 27 च्या जादुई आकड्यासाठी जुडवाजुड करण्यास कमालीची कसरत करावी लागणार आहे.